बाइकवर स्टंट करणारे तर तुम्ही अनेक जण पाहिले असतील. पण, पंजाबमधील २१ वर्षीय तरुण शेतकरी गग्गी बांसरा असे काही स्टंट करत आहे की, पाहणा-याच्या काळजाचा ठोका चुकतो. हा तरुण सध्या सोशल मीडियात हीरो ठरला आहे. एक टन वजनाच्या ट्रॅक्टरवर तो असा स्टंट करतो की, आपला श्वास आपोआप रोखला जातो. आपल्या शेतात तो नियमितपणे ट्रॅक्टरचे असे स्टंट करत असतो. तो केवळ मागच्या चाकावर ट्रॅक्टर चालवितो. चार वर्षांपासून तो हे स्टंट करत असून सोशल मीडियावर त्यांचे स्टंट व्हायरल झाले आहेत.
हे स्टंट पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय नाही राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 04:34 IST