शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीसोबत सहमतीनं सेक्स केल्यास गुन्हाच, न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 07:47 IST

दोन तरुणांनी अल्पवयीन मुलीबरोबर सहमतीनं केलेला सेक्स गुन्हाच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्लीतल्या एका कनिष्ठ न्यायालयानं दिला आहे.

नवी दिल्लीः दोन तरुणांनी अल्पवयीन मुलीबरोबर सहमतीनं केलेला सेक्स गुन्हाच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्लीतल्या एका कनिष्ठ न्यायालयानं दिला आहे. 15 वर्षांच्या अल्पवयीन तरुणीबरोबर मैत्री केल्यानंतर दोन तरुणांनी तिच्याबरोबर दुष्कृत्य केलं. या प्रकरणात न्यायालयानं दोन्ही आरोपींना दोषी ठरवलं आहे.न्यायाधीश उमेद सिंह ग्रेवाल यांनी दोन्ही आरोपी परवेश राणा (30) आणि आशीष सेहरावत (41) यांना दोषी ठरवत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्या आरोपींनी मुलीच्या सहमतीनं संबंध ठेवल्याचा न्यायालयात दावा केला होता. त्यानंतरही न्यायालयानं अल्पवयीन मुलीच्या सहमतीनं शारीरिक संबंध ठेवला तरी तो गुन्हाच ठरणार असल्याचा निर्वाळा दिला होता. कलम 375 अंतर्गत 16 वर्षांहून कमी वयाच्या अल्पवयीन मुलीबरोबर सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्यास ते दुष्कृत्यच ठरतं. या प्रकरणात दोषी ठरवलेल्या परवेश राणा यानं गेल्या 6 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा भोगली आहे आणि आशिष जवळपास साडेपाच वर्षं तुरुंगवासात होता. या आरोपींनी आधीच तुरुंगवास भोगला असल्यानं न्यायालयानं आधीच्या शिक्षेएवढी शिक्षा त्या दोषींना दिली आहे.तसेच राणाला 40 हजार आणि सेहरावत यांना 60 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यातील 80 टक्के रक्कम भरपाईच्या स्वरूपात पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. 2009मध्ये या आरोपींनी हे दुष्कृत्य केलं होतं. या प्रकरणात इतर दोन आरोपी गुलशन आणि अमितला न्यायालयानं आरोपमुक्त केलं आहे. पीडितेनं आपल्या जबाबात या दोघांनीही माझ्याबरोबर कोणताही चुकीचा प्रकार केला नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर न्यायालयानं अपहरण आणि सामूहिक बलात्काराच्या आरोपांतून गुलशन आणि अमितची मुक्तता केली होती. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळ