शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'करकरे असते तर यापूर्वीच दोषमुक्त झालो असतो'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 03:41 IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीचा पुण्यातील पत्रकार परिषदेत दावा

पुणे : हुतात्मा हेमंत करकरे यांच्याविषयी मला आदर आहे़ ते असते तर यापूर्वीच मी या खटल्यातून दोषमुक्त झालो असतो. हुतात्म्याविषयी कोणी अनावधानानेही अवहेलना करु नये, असे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले़बॉम्बस्फोटातील आरोपी राकेश धावडे, त्यांच्या वकील नीता धावडे आदी उपस्थित होते़ कुलकर्णी म्हणाले, साध्वींनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे़ आमचा मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंध नाही, हे करकरे यांना समजल्यानंतर आम्हाला मारहाण झाली नाही़ ते जिवंत असते तर त्यांनी दोषारोप दाखल करण्यापूर्वीच आम्हाला वगळले असते़ ते गेल्याने आमचे नुकसान झाले़ दहशतवाद विरोधी पथकातही काही चांगले अधिकारी आहेत, त्यांच्यामुळे आम्ही आज जिवंत आहोत.नऊ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर राकेश धावडे यांचे चार प्रकरणातील निर्दोषत्व सिद्ध झाले. मी वकील असूनही त्याला मदत करुन शकले नाही, सामान्य आरोपींची काय गत होत असेल, असा प्रश्न अ‍ॅड़ नीता धावडे यांनी केला़ राकेश धावडे यांनी सांगितले की, मी इतिहासाचा अभ्यासक आहे़ तेव्हाच्या राजकारणाचा आम्ही बळी आहोत़ मला ६२ दिवस अमानवीय मारहाण झाली़ आता खटल्यातून पूर्णत: काढून टाकले आहे़प्रज्ञा सिंहांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीसाध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत खटला चालू आहे. त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, अजित अभ्यंकर, सुभाष वारे, किरण मोघे, सुनीती सु. र., डॉ. वर्षा आल्हाट आदी सुमारे चाळीस विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या मागणीपत्रावर स्वाक्षरी केली आहे.

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर