शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लाखभराच्या पगारासाठी जाल तर संकटात याल! भारतीयांना युद्धात ढकलणारे ४ जण सीबीआयच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 09:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारतीयांना फसवून रशिया - युक्रेनच्या युद्धात पाठविण्याच्या प्रकरणात सीबीआयने चार लोकांना अटक केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीयांना फसवून रशिया- युक्रेनच्या युद्धात पाठविण्याच्या प्रकरणात सीबीआयने चार लोकांना अटक केली आहे. त्यातील तीन जण भारतातील व एक जण रशियातील संरक्षण मंत्रालयात अनुवादक पदावर कार्यरत असलेला कर्मचारी आहे. या सर्वांना गेल्या २४ एप्रिल रोजीच अटक करण्यात आली होती. मात्र, त्याची माहिती आता उजेडात आली आहे. 

याप्रकरणी अटक केलेल्या लोकांमध्ये अरुण, येशुदास यांचा समावेश असून ते तिरुवनंतपुरमचे रहिवासी आहेत. तिसरा आरोपी अँथनी एलांगोवन हा मुंबईला राहतो. निजिल जोबी बेनसाम हा रशियातील संरक्षण मंत्रालयात अनुवादक आहे. उत्तम नोकरी व चांगला पगार यांचे आमिष दाखविणाऱ्या जाहिराती सोशल मीडियावर झळकवून हे लोक भारतीयांना जाळ्यात ओढायचे. रशियात बोलावल्यानंतर लोकल एजंटच्या मदतीने त्यांना रशिया-युक्रेनच्या युद्धासाठी रशियाच्या लष्करात भरती केले जायचे.

संरक्षण मंत्रालयातील अनुवादक टोळीचा साथीदारnसीबीआयने यासंदर्भात सांगितले की, रशियाच्या संरक्षण मंत्रालयातील अनुवादक निजिल जोबी बेनसाम हा या टोळीचा महत्त्वाचा साथीदार होता. तो भारतीयांना रशियाच्या लष्करामध्ये भरती करण्याचे काम करत होता. nमुंबईतील अँथनी हा दुबईतील आपले साथीदार फैजल बाबा व रशियातील आपल्या दुसऱ्या साथीदारांशी संगनमत करून भारतीयांचे व्हिसा, विमानाचे तिकीट तयार करत असे. अरुण व येशुदास हे स्थानिक एजंट होते. 

अशी होते फसवणूक; कंपन्या करतात काय?युद्धामुळे कोसळलेल्या इमारती, त्यांचे ढिगारे उपसण्याच्या कामासाठी कर्मचारी हवेत, असे सांगितले जाते. ही नोकरी करणाऱ्याला दरमहा १ लाख रुपये पगार मिळणार असून त्यांना सीमेवर लढाई करण्यासाठी पाठविले जाणार नाही, असे आश्वासनही दिलेले असते. मात्र, प्रत्यक्षात रशियात पोहोचल्यावर या लोकांना युद्धात लढण्यासाठी पाठविले जाते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया