शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिराच्या आड याल तर हज यात्रा रोखू, भाजपा आमदाराचे प्रक्षोभक वक्तव्य

By admin | Updated: July 13, 2017 21:03 IST

देशातील मुस्लिमांनी राम मंदिर बांघण्याच्या आड येऊ नये, मुस्लिमांनी जर राम मंदिर बांधण्यास विरोध केला तर आम्ही त्यांना

 ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 13 - भाजपा नेत्यांकडून मुस्लिमांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची मालिका सुरूच आहे. देशातील मुस्लिमांनी राम मंदिर बांघण्याच्या आड येऊ नये, मुस्लिमांनी जर राम मंदिर बांधण्यास विरोध केला तर आम्ही त्यांना मक्का - मदिनेस जाऊ देणार नाही, असे विखारी वक्तव्य भाजपाचे उत्तर प्रदेशातील आमदार बृजभूषण सिंह उर्फ गुड्डू राजपूत यांनी केले आहे. 
उत्तर प्रदेशमधील चरखारी विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या बृजभूषण सिंह यांनी फेसबूक पोष्टमधून हे आक्षेपार्ह विचार मांडले आहेत.  ते म्हणतात, "येत्या काळात आम्ही सर्व 100 कोटी हिंदू मिळून निश्चितपणे राम मंदिर बांधू. हिंदूंनी आता राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला पाहिजे. जर राम मंदिराच्या बांधकामात मुस्लिमांनी अडथळा आणला. तर त्यांनासुद्धा मक्का आणि मदिनेस जाण्यापासून रोखण्याचे काम हा गुड्डू राजपूत करेल. आम्ही त्यांच्याविरोधाच बोलत नाही. प्रत्येक गोष्टीत आम्ही त्यांना साथ देतो. पण ही मंडळी हिंदूंच्या प्रत्येक सणात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात." या संदर्भातील वृत्त नवभारत 
टाइम्सने प्रकाशित केले आहे. 
सरकार हज यात्रेवर सब्सिडी देते. आम्ही यांच्या यात्रेस विरोध करत नाही. तर हजला जाणाऱ्यांचे फुलांच्या माळा घालून स्वागत करतो. जर आम्ही त्यांच्याशी असे वागत असू तर आमचे आराध्य श्री राम यांचे मंदिर बांधू देणे हे यांचे कर्तव्य आहे, असेही भाजपा आमदारांनी पुढे म्हटले आहे.  
याआधी तेलंगणातील भाजपा आमदाराने बंगालमधील तणावावरून असेच आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. बंगालमधील पेटलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील भाजपा आमदार राजा सिंह यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. "बंगालमधील हिंदूंकडे सध्या दोनच रस्ते आहेत. एक म्हणजे काश्मीरप्रमाणे नपुंसक बनून तेथून पळ काढायचा किंवा संघटित होऊन 2002च्या गुजरात दंगलीची बंगालमध्ये पुनरावृत्ती करावी." असे  या व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये राजा सिंह म्हणाले होते.