शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'बॉम्ब जंगलात पडले असते, तर पाकिस्ताननं त्वरित प्रत्युत्तर दिलं नसतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 13:23 IST

हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांचं पाकिस्तानला प्रत्युत्तर

कोईमतूर: एअर स्ट्राइकमध्ये कोणतंच नुकसान झालं नाही, दहशतवादी मारले गेले नाहीत, भारतीय हवाई दलाचे बॉम्ब जंगलात पडले, असे विविध दावे करणाऱ्या पाकिस्तानला हवाई दलानं मोजक्या शब्दात चोख प्रत्युत्तर दिलं. आमचे बॉम्ब जंगलात जंगलात पडले असते, तर पाकिस्तानचे पंतप्रधान यावर बोलले नसते आणि त्यांच्याकडून प्रत्युत्तरादाखल कारवाईदेखील झाली नसती, असं उत्तर हवाई दलाचे प्रमुख बी. एस धनोआ यांनी पाकिस्तानला दिलं. भारतीय हवाई दलाचा हल्ला अयशस्वी झाल्याचा दावा पाकिस्तानकडून वारंवार करण्यात आला. त्यासाठी बालाकोट, चकोठी आणि मुझफ्फराबाद येथील भागांचे फोटो दाखवण्यात आले. या भागात सारं काही आलबेल असल्याचं चित्र पाकिस्ताननं उभं केलं. त्यावर हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं. एअर स्ट्राइकदरम्यान टाकलेले बॉम्ब जंगलात पडले, असा दावा त्यांनी (पाकिस्ताननं) केला. पण आमचे बॉम्ब जर जंगलात पडले असते, तर त्यांनी (पाकिस्तानी पंतप्रधान) प्रत्युत्तर दिलं नसतं. आम्ही लक्ष्यभेद केला. त्यामुळेच तर प्रतिहल्ला करण्यात आला, असं धनोआ म्हणाले. हवाई दलाच्या कारवाईत नेमके किती दहशतवादी मारले गेले, यावरुन सध्या देशात राजकारण सुरू आहे. त्यामुळे याबद्दलचा प्रश्नदेखील धनोआ यांना विचारण्यात आला. त्यावर किती दहशतवादी मेले हे मोजणं आमचं काम नव्हे, आम्ही फक्त लक्ष्यभेद करतो, असं उत्तर धनोआ यांनी दिलं. आम्ही फक्त लक्ष्य ठेवतो आणि ते पूर्ण करतो, किती दहशतवादी मारले हे मोजणं आमचं काम नाही, असं धनुआ यांनी स्पष्ट केलं.भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. एअर स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात यावरुन राजकारण सुरू झालं आहे. विरोधी पक्षांकडून नेमके किती दहशतवादी मारले याचा आकडा सरकारने जाहीर करावा, अशी मागणी होत होती. तर, पाकिस्ताकडूनही या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं होतं. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी