शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय नसल्यास पुरस्कार परत घेणार

By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST

जिल्हा परिषद : निर्मलग्राम पुरस्कृत ग्रामपंचायतींना इशारा

जिल्हा परिषद : निर्मलग्राम पुरस्कृत ग्रामपंचायतींना इशारा
नागपूर : स्वच्छतेविषयी चांगले काम केल्याने जिल्ह्यात २००६ ते २०११ या कालावधीत ३०७ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले होते. या ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या आधारावर ५० हजार ते ५ लाखापर्यंत पुरस्कार स्वरूपात अनुदान देण्यात आले. परंतु या गावात आता वर्षात शौचालय नसलेले कुटुंब आहेत. शौचालय नसल्याचे आढळल्यास अनुदानात कपात करून निर्मलग्राम पुरस्कार परत घेतला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने संपूर्ण जिल्हा निर्मल करण्याच्या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न सुरू आहेत. निर्मलग्राम पुरस्कृ त ग्रामपंचायतींना स्वच्छताविषयक दर्जा सुधारण्यासह टिकवणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना तीन महिन्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
स्वच्छतेविषयी चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींची दखल घेऊ न केंद्र सरकारने निर्मलग्रामने पुरस्कृत केले होते. पुरस्कारामुळे निर्मल दर्जा मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. यातून समाजात स्वच्छतेची चळवळ सुरू झाली. पुढे या अभियानाचे निर्मल भारत असे नामकरण करण्यात आले. २ ऑक्टोबर २०१४ पासून या अभियानाचे नामकरण स्वच्छ भारत मिशन असे झाले आहे. एक पाऊ ल स्वच्छतेकडे असे अभियानाचे घोषवाक्य आहे. या अभियानाची व्याप्ती वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करणे अपेक्षित आहे; तेव्हाच खऱ्या अर्थाने उघड्यावरील शौचविधीचे निर्मूलन होऊ न २०१९ पर्यंत जिल्हा निर्मल व स्वच्छ होईल. ३०७ ग्रामपंचायतींपैकी काहींनी स्वच्छतेविषयी सातत्य टिकवून ठेवले नसल्याचे पायाभूत सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. या ग्रामपंचायतींना तीन महिन्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
चौकट...
निर्मलग्राम पुरस्कृत ग्रामपंचायती
पंचायत समिती ग्रामपंचायतीची निर्मलग्राम
संख्या पुरस्कृत ग्रा.पं.
भिवापूर ५६ ११
हिंगणा ५५ २४
कळमेश्वर ५१ ३०
कामठी ४८ २४
काटोल ८३ २४
कुही ६० १४
मौदा ६२ २३
नागपूर ७० ४५
नरखेड ७० ३६
पारशिवनी ५२ १०
रामटेक ४५ २१
सावनेर ७५ २३
उमरेड ४७ २२
एकूण ७७४ ३०७