शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

जर अरविंद केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात प्रामाणिक कोणी नाही; केजरीवाल यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 13:14 IST

सीबीआयकडून चौकशीला बोलविणे म्हणजे केजरीवाल यांना अटक करण्याचा कट आखण्य़ात आला आहे, असा आरोप आपने केला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या चार्जशीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीबीआयने दारु घोटाळ्यात केजरीवालांना नोटीस पाठविल्यानंतर केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत. ईडी सिसोदियांनी १४ फोन तोडून टाकल्याचे जे दावे करत आहे, त्यापैकी ४ फोन स्वत: ईडीकडे आहेत. तर एक सीबीआयकडे, हे कसे काय, असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. 

दारु घोटाळा तर झालेलाच नाहीय. यामुळे या तपास यंत्रणांकडे काहीही नाहीय. चंदन रेड्डी नावाच्या व्यक्तीला मारहाण झाल्याचा उल्लेख ईडीने चार्जशीटमध्ये केला आहे, असेही केजरीवाल म्हणाले. सीबीआयने अबकारी निती घोटाळ्याविरोधाच केजरीवाल यांची रविवारी चौकशी करणार आहे. 

उद्या त्यांनी (सीबीआय) मला बोलावले आहे आणि मी नक्की जाईन. जर अरविंद केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात प्रामाणिक कोणी नाही... भाजपने सीबीआयला मला अटक करण्याचे आदेश दिले असतील तर सीबीआय त्यांच्या सूचनांचे पालन करेल, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

सीबीआयकडून चौकशीला बोलविणे म्हणजे केजरीवाल यांना अटक करण्याचा कट आखण्य़ात आला आहे. यामुळे आप झुकणार नाही, व केजरीवाल देखील झुकणार नाहीत. केजरीवालांनीच भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला आहे. यामुळेच त्यांना गप्प करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे होऊ देणार नाही, असे आपच्या नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे. 

सीबीआयला घाबरणारा नाही सीबीआय व ईडीच्या धमक्यांना मी घाबरणारा नाही. मी वेगळ्या मातीचा आहे. या सर्वांचा मी सामना करण्यास तयार आहे. माझे शब्द कदाचित चुकीचे असतील परंतु तुमचे कर्म हे फुटके आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

सत्य समोर येईल : भाजपसीबीआयच्या चौकशीतून सत्य समोर येणार आहे. या सर्व घोटाळयामागे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा हात असल्याचा दावा भाजपतर्फे केला जात होता. सीबीआयने दिलेल्यासमन्सने हा दावा योग्य होता, हे स्पष्ट झाल्याचे दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी म्हटले आहे. 

सिसोदियांनाही रविवारचे समन्स सीबीआय रविवारीच नेत्यांना समन्स बजावित असल्याचे पुन्हा दिसून आले. मनीष सिसोदिया यांनाही सीबीआयने चौकशीसाठी २६ फेब्रुवारी (रविवार) राेजी बोलाविले होते. मुख्यमंत्री केजरीवाल यांनाही रविवारीच (१६ एप्रिल) चौकशीसाठी पाचारण केले आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय