शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

बलात्कार केला तर मग जखमा कुठे आहेत? ओडिशा उच्च न्यायालयाकडून आरोपीची निर्दोष सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 07:39 IST

न्यायाधीश संगम कुमार साहू यांनी हा निर्णय दिला. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की, पीडित एक प्रौढ महिला असून, तिला लैंगिक संबंधांचा अनुभव आहे. तिने आरोपीला कोणताही विरोध केला नाही.

भुवनेश्वर : विवाहित महिलेने कथित जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्याला विरोध केला नाही. तिला जखमा झाल्या नाहीत. एक विवाहित महिला असल्याने तिला लैंगिक संबंधांची चांगली माहिती होती. ती समोरील व्यक्तीला विरोध करू शकली असती. मात्र, तिने तसे केले नाही, असे म्हणत ओडिशा उच्च न्यायालयाने नुकतेच वहिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपातील आरोपीची निर्दोष सुटका केली.

न्यायाधीश संगम कुमार साहू यांनी हा निर्णय दिला. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की, पीडित एक प्रौढ महिला असून, तिला लैंगिक संबंधांचा अनुभव आहे. तिने आरोपीला कोणताही विरोध केला नाही.

हे कृत्य संमतीशिवाय झाले असते, तर तिच्या शरीरावर काही जखमा झाल्या असत्या; कारण त्याच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकरणात महिलेकडून असा कोणताही विरोध झाला नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पीडितेने या घटनेत फेरफार केला आणि तिच्यावर बलात्कार करत असल्याचे भासवले, असे कोर्टाने म्हटले.

नेमके काय घडले होते? २०१४ मध्ये ती एका सांयकाळी जंगलातून घरी जात असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, असे महिलेने म्हटले होते. तिच्या पतीने तिचा शोध सुरू केला असता ती त्याच्या लहान भावासोबत नको त्या स्थितीत आढळून आली. यावेळी पतीला पाहून महिलेने आरोपीला लाथ मारत घटनास्थळावरून पळ काढला.

महिलेने आक्षेप घेतला नाही -- पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपीला बलात्कारासाठी जबाबदार ठरवले. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. - आरोपीने केलेल्या कथित लैंगिक संबंधांवर महिलेने आक्षेपही घेतला नाही किंवा विरोधही केला नाही, या वस्तुस्थितीमुळे न्यायालयाने आरोपीविरुद्धचा खटला अखेर रद्द केला.

टॅग्स :OdishaओदिशाCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय