शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद संपविण्याची इच्छा असेल, तर पाकला सैन्य पुरवू - राजनाथ सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 04:43 IST

राफेल असती तर बालाकोटची गरजच नव्हती, पाकिस्तानने आपले वागणे अजूनही सुधारावे

कर्नाल/चंदीगड : पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवाद समाप्त करण्याची पाकिस्तानची जर खरेच इच्छा असेल तर भारत त्यांना सैन्यपुरवठा करण्यास तयार आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी पाकला सुनावले. पाकिस्तानला आपल्या देशाचे आणखी तुकडे व्हायला नको असतील तर त्यांनी आपले वागणे अजूनही सुधारावे, असा इशाराही त्यांनी दिला.

हरयाणा विधानसभा निवडणुकीत पतौडी येथील प्रचारसभेत राजनाथसिंह म्हणाले: आज मला अत्यंत नम्रपणे पाकिस्तानला अशी सूचना करावीशी वाटते की, त्यांनी आपली विचारसरणी बदलावी. अन्यथा पाकिस्तानचे एकदा दोन तुकडे झालेच आहेत. आता त्याची अनेक शकले उडतील.ते असेही म्हणाले की, पाकिस्तानने प्रामाणिकपणे वागावे, दहशतवादाचे उच्चाटन करावे आणि बंधुभाव ठेवावा, असे मला त्यांना सांगावेसे वाटते. आपण शेजारी देश आहोत व आपल्याला एकत्रितच वाटचाल करायची आहे. तुम्ही स्वत:हून प्रामाणिकपणे दहशतवादाशी मुकाबला केला नाहीत, तर भारत स्वत:च्या जोरावर या शक्तिंचा बिमोड करण्यास भारत समर्थ आहे, हे पाकिस्तानने पक्के समजून घ्यावे.

कर्नाल येथील आणखी एका सभेत ते म्हणाले की, भारताकडे आधीपासूनच राफेल लढाऊ विमाने असती तर बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण तळ उद््ध्वस्त करण्यासाठी आपल्याला पाकिस्तानमध्ये घुसावेही लागले नसते. (राफेल विमानांनी) इथून भारतातूनच आपल्याला ते काम फत्ते करता आले असते, असेही राजनाथसिंह म्हणाले. (वृत्तसंस्था)त्यांनी निष्कारण वाद घातला...फ्रान्समध्ये पहिले राफेल विमान स्वीकारल्यानंतर तेथे केलेल्या शस्त्रपूजेवरून झालेल्या वादाविषयी ते म्हणाले की, मी त्या लढाऊ विमानावर ‘ओम’ असे लिहून त्यास ‘रक्षा बंधन’ (लिंबू-मिरची) बांधले. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी वाद सुरू केला. आता आपल्याला राफेल मिळताहेत याचे स्वागत करण्याऐवजी त्यांनी निष्कारण वाद घातला. त्यांच्या अशा विधानांनी पाकिस्तानलाच अधिक बळ मिळते.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह