शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राव, रेड्डी, पटनायक ठरतील किंगमेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 05:36 IST

लोकसभा निवडणुकांत कोणत्याच एका पक्षाला वा आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती व वायएसआर काँग्रेस हे पक्ष काय भूमिका घेणार, हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत कोणत्याच एका पक्षाला वा आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती व वायएसआर काँग्रेस हे पक्ष काय भूमिका घेणार, हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. कोणत्याही पक्ष वा आघाडीला बहुमत न मिळाल्यास या तीन पक्षांची मनधरणी केल्याशिवाय सर्वात मोठा पक्ष वा आघाडीला पर्याय राहणार नाही.बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती व वायएसआर काँग्रेस हे सध्या भाजप वा काँग्रेस यांच्यापैकी कोणत्याही आघाडीत नाहीत. त्यांनी आपापल्या राज्यात स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या असून, त्यांना तिथे भाजप व काँग्रेस यांचा सामना करावा लागला आहे. पंतप्रधान मोदी व भाजप यांनी या तिन्ही पक्षांना चुचकारण्याचा मध्यंतरी प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही.हे पक्ष निवडणुकीनंतर नेमकी काय भूमिका घेणार, हे स्पष्ट झालेले नाही. ओडिशामध्ये लोकसभेच्या २१, आंध्र प्रदेशात २५ व तेलंगणात १७ अशा एकूण ६३ जागा आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकांत त्यापैकी बिजू जनता दलाने २०, वायएसआर काँग्रेसने ९ व टीआरएसने ११ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच ६३ पैकी ४० खासदार या तीन पक्षांचे होते. त्यांना यंदाही तितक्या वा त्याहून अधिक जागा मिळाल्यास तेच किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

त्यापैकी टीआरएसचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी प्रादेशिक पक्षांची आघाडी बनवण्याचा प्रयत्न चालवला असला तरी त्यांना यश येताना दिसत नाही. द्रमुक, जनता दल (धर्मनिरपेक्ष), बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस यापैकी एकाही पक्षाने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. राव यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची अलीकडेच भेट घेतली. पण त्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही राव यांच्या आघाडीसोबत जाण्याची शक्यता नाही.बिजू जनता दलाचे प्रमुख व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही भूमिका जाहीर केलेली नाही. चक्रीवादळात उचललेल्या पावलांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. तरीही पटनायक बोलायला तयार नाहीत. वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनीही आपले पत्ते आतापर्यंत उघड केलेले नाही. मात्र वायएसआर काँग्रेस व टीआरएस यांचा तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांना विरोध आहे.नायडू यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसची मैत्री केली आहे. त्यामुळे नायडू असलेल्या आघाडीत रेड्डी व चंद्रशेखर राव यांना जुळवून घ्यावे लागेल. अर्थात राजकारणात कोणीच कोणाचा कायम मित्र वा शत्रू नसतो. त्यापैकी चंद्रशेखर राव यांनी भाजपसोबत न जाण्याचे संकेत दिले आहेत. वायएसआर काँग्रेस हा पक्षच मुळी काँग्रेसमधील फुटीतून निर्माण झाला आहे. त्यामुळे तो पक्ष भाजपपेक्षा आपल्याकडे येण्याची अधिक शक्यता असल्याचे काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.मतदानाचा शेवटचा टप्पा १९ मे रोजी संपला की २१ मे रोजी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक दिल्लीत होणार आहे. त्यास चंद्रशेखर राव उपस्थित राहतील, असे कळते. मात्र रेड्डी व पटनायक हे बैठकीला हयि राहणार का, हे अद्याप नक्की नाही.

उपपंतप्रधानपद हवे?तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी विरोधकांच्या आघाडीसह जाण्याचे ठरवल्याची चर्चा आहे. मात्र विरोधी पक्षांच्या आघाडीचे सरकार आल्यास आपणास उपपंतप्रधानपद दिले जावे, अशी त्यांची अट असल्याचे सांगण्यात येते. त्यांची ही अट टीआरएसच्या नेत्यांनी काँग्रेसपर्यंत पोहाचवली आहे; पण निकाल लागेपर्यंत त्याबाबत निर्णयच घेऊ नये, असे काँग्रेसने ठरवले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक