शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

'हिंदू' असल्याचे मान्य असेल तरच मुस्लिमांनी भारतात राहावे- सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 13:54 IST

ओवेसी यांनी लोकसभेत मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणून हिणवाऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी केली

नवी दिल्ली: मुस्लिमांना भारतात राहायचे असेल तर त्यांना आपले पूर्वज हिंदू असल्याचे मान्यच करावे, असे वक्तव्य भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. ते बुधवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तत्पूर्वी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणून हिणवाऱ्यांना शिक्षा करण्याचा कायदा करावा, अशी मागणी केली. भारतात जे मुस्लिम आहेत त्यांनी मोहम्मद अली जिन्ना यांच्या दोन राष्ट्रांचा सिद्धांत नाकारला आहे. पण आजही भारतीय मुस्लिमांना बाहेरचे समजले जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधल्यास तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षेची तरतूद असावी. पण केंद्रातील भाजपा सरकार असं कोणतंही विधेयक आणणार नाही, असे ओवेसी यांनी म्हटले होते. राजकीय वर्तुळात ओवेसी यांच्या वक्तव्याचे पडसाद लगेचच उमटले. सुब्रमण्यम स्वामी यांनी भारतात राहायचे असल्यास मुस्लिमांना काही अटी मान्य कराव्या लागतील, असे सांगितले. तुम्ही या देशाचे नागरिक असाल तर तुमचे पूर्वज हिंदूच होते, ही बाब तुम्हाला निर्विवादपणे मान्य करावी लागेल. मुस्लिमांचा मूळ डीएनए हिंदूंचाच आहे, यामध्ये कोणतीही शंका नसल्याचेही सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले. तर भाजपा खासदार विनय कटियार यांनी मुस्लिमांना या देशात राहण्याचा हक्कच नसल्याचे म्हटले.  मुस्लिमांना या देशात राहण्याचा हक्कच नसल्याचे म्हटले. मुस्लिम लोकसंख्येच्या आधारावर भारताची फाळणी करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्यात आला होता. मग मुस्लिमांना भारतात राहण्याची आवश्यकताच काय आहे?, असा सवालही कटियार यांनी उपस्थित केला. मुस्लिमांना वेगळा भूभाग देण्यात आला असल्याने भारतामधील मुस्लिमांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात राहायला जावे, असेही कटियार यांनी सांगितले. 

टॅग्स :Muslimमुस्लीमHinduहिंदू