शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

'मोदी PM बनले नसते, तर चीन अन् पाकिस्तानने डोळे वर करून बघितलं असतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 17:27 IST

योगी आदित्यनाथ यांनी हरियाणातील फरीदाबादमधील नाथ संप्रदायाच्या कार्यक्रमात संबोधित केले. त्यावेळी, मोदींवर स्तुतीसुमने उधळताना चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांना भारताने दिलेल्या प्रत्युत्तराची आठवण करून दिली.

ठळक मुद्दे यापूर्वीही उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील एका मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्तुती करताना केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले हते. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत, असे त्यांनी म्हटले होते.

नवी दिल्ली - आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात अन्य पक्ष असाच सामना सध्यातरी दिसत आहे. भाजपनेही रणनीती आखायला सुरुवात केली असून, विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. युपीचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ हे पंतप्रधाननरेंद्र मोदींचं कौतुक करत, आणि युपी सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचत नागरिकांचं प्रबोधन करत आहेत. 

योगी आदित्यनाथ यांनी हरियाणातील फरीदाबादमधील नाथ संप्रदायाच्या कार्यक्रमात संबोधित केले. त्यावेळी, मोदींवर स्तुतीसुमने उधळताना चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांना भारताने दिलेल्या प्रत्युत्तराची आठवण करून दिली. जर, 2014 मध्ये नरेंद्र मोदीपंतप्रधान बनले नसते, तर चीन आणि पाकिस्तान यांनी भारताला डोळे वर करुन पाहिले असते. यापूर्वी जिन्ना समर्थकांनी रामभक्तांवर गोळ्या चालवल्या, पण आता गोळ्या दहशतवादी आणि देशद्रोह्यांवर चालवल्या जात आहेत, असे योगींनी म्हटले.  योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वी पटेल-जिन्ना यांच्या विधानावरुन तिखट प्रतिक्रिया दिली होती. सपा प्रमुखांनी जिन्ना यांची तुलना सरदार पटेल यांच्याशी केली. अखिलेख यांची टीका लाजीरवणी होती, ही तालिबानी मानसिकता असून फुटीरतावादावर विश्वास ठेवते, असेही योगींनी म्हटले होते.  

दरम्यान, यापूर्वीही उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील एका मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्तुती करताना केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले हते. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत, असे त्यांनी म्हटले होते. उत्तर प्रदेशमधील हरदोई येथील एका जनसभेला संबोधित करताना योगी सरकारमधील मंत्री उपेंद्र तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यावेळी, नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार असून, ते प्रधानसेवकच्या रुपात काम करायला आलेत, असे त्यांनी म्हटले होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानyogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव