शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर दिल्लीश्वरांवर खरंच भजी तळण्याची वेळ येईल- संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:14 IST

दहशतवादी हिंदुस्थानची नाडी कश्मीरात रोज सोडत आहेत

नवी दिल्ली: पाकिस्तानकडून होणारे हल्ले गंभीरतेने घेतले नाहीत तर लवकरच दिल्लीत बसलेल्यांवर भजी तळण्याची वेळ येईल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला. ते गुरुवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये रोज भारतीय जवान शहीद होत आहेत. मंगळवारी (6 फेब्रुवारी) श्रीनगरमधील रुग्णालयात शिरून दहशतवाद्यांनी गोळीबारही केला. एवढे होऊनही आपण या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नाहीत तर एक दिवस आपल्या सर्वांवर दिल्लीत बसून भज्या तळण्याची वेळ येईल, असे राऊत यांनी म्हटले. तत्पूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तूनही केंद्र सरकारच्या काश्मीरमधील अपयशावर ताशेरे ओढण्यात आले. पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी हिंदुस्थानची नाडी कश्मीरात रोज सोडत आहेत व त्यामुळे तिरंग्यास मान खाली घालावी लागत आहे. देश गंभीर संकटात असताना ‘पकोडे-भजी’ यावर चर्चेत गुंतवून ठेवायचे व कश्मीरात आमच्या जवानांनी रोजच शहीद व्हायचे. मोदी सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षे झाली आहेत. कश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला आहे. जवान मरत आहेत व कश्मिरी पंडित अजूनही निर्वासित आहेत असे अग्रलेखात म्हटले आहे. 

 

Ceasefire Violation : पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नाही तर भारताला नामर्द म्हटलं जाईल - संजय राऊत पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला होता. यामध्ये भारतीय लष्कराच्या बंकर्सचे मोठे नुकसान झाले होते. या हल्ल्यात भारतीय लष्कराचा एक कॅप्टन व तीन जवान शहीद झाले. तर बीएसएफचा एक जवान व दोन मुलांसह चार जण जखमी झाले होते. याविषयी संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. ''शस्त्रसंधी उल्लंघनापेक्षा हे युद्धच आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना जशास तसं उत्तर द्यायलं हवं'', अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. जर या हल्ल्यास प्रत्युत्तर दिले गेले नाही तर भारताला जगामध्ये नामर्द म्हटले जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानShiv Senaशिवसेना