शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

त्याच दिवशी संसदेवर चालून गेलो असतो, तर संपूर्ण प्रकरण...; बांगलादेशचा उल्लेख करत हे काय बोलले राकेश टिकैत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 10:02 IST

टिकैत म्हणाले, 'हे शोधून सापडणार नाही. जनता प्रचंड रागात आहे. हे तर त्या दिवशी जेव्हा ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत गेले, तेव्हा त्यांची दिशाभूल करण्यात आली की लाल किल्ल्यावर चला. त्याच दिवशी संसदेकडे वळवले असते तर...

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बांगलादेशातील परिस्थितीचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले आहे. मेरठमध्ये एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना टिकैत म्हणाले, बांगलादेशात जी व्यक्ती गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत आहे, विरोधीपक्षाचे सर्व नेते कारागृहात बंद आहेत, तेव्हा अशीच परिस्थिती निर्माण होते. असेच येथेही होईल.

टिकैत म्हणाले, 'हे शोधून सापडणार नाही. जनता प्रचंड रागात आहे. हे तर त्या दिवशी जेव्हा ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत गेले, तेव्हा त्यांची दिशाभूल करण्यात आली की लाल किल्ल्यावर चला. त्याच दिवशी संसदेकडे वळवले असते तर..., त्या दिवशी 26 जानेवारी होती, नाही तर, 25 लाख लोक होते. त्याच दिवशी संपूर्ण प्रकरण निकाली निघाले असते. चूक झाली.

एका प्रश्नावर टिकैत हसत म्हणाला, "आता जनतेची तयारी आहे, चिंता करू नका. नक्की होणार. तयार आहोत." टिकैत यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणीही केली आहे.

कोलकात्याच्या घटनेवर म्हणाले, सरकारविरोधात कट - यावेळी राकेश टिकैत यांनी कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले, "चुकीचे घडले, कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी. देशात कायदा आणि संविधान आहे. बलात्कार आणि हत्या झाली. बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पण, संपूर्ण देशात हायलाइट करणे, सरकारला (ममता सरकार) बदनाम करण्याची योजना तर नाही? बलात्कार आणि हत्या झाली, त्यासाठी देशात कायदा आहे. मात्र, संपूर्ण देशात गेल्या दहा दिवसांपासून तोच मुद्दा उपस्थित करणे, त्यानंतर कुठली बलात्कार आणि हत्या झाली नाही का?" असा सवालही टिकैत यांनी यावेळी केला.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारMamata Banerjeeममता बॅनर्जीParliamentसंसदwest bengalपश्चिम बंगालBangladeshबांगलादेशNarendra Modiनरेंद्र मोदी