शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शंका आल्यास कथुआ बलात्कार खटला अन्यत्र हलवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:40 IST

सुप्रीम कोर्ट; कथुआ बलात्कार पीडितेच्या वडिलांनी घेतली धाव

नवी दिल्ली : देशभरात गाजणाऱ्या कथुआ बलात्कार खटल्याचे कामकाज स्थानिक न्यायालयात निष्पक्षपणे होत नसल्याची जरा जरी शंका आली तरी हा खटला दुसºया ठिकाणी वर्ग करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले आहे. हा खटला जम्मू-काश्मीर राज्याच्या बाहेर विशेषत: चंदीगड येथे वर्ग केला जावा, अशी बलात्कारित मुलीच्या वडिलांनी केली असून, तिला कथुआ प्रकरणातील दोन प्रमुख आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या आरोपींच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, केवळ आरोपीच नव्हे तर बलात्कारित मुलगी, तिचे कुटुंबीय यांच्या दृष्टीनेही हा खटला कथुआ येथील न्यायालयात निष्पक्षपणे चालविला जाणे आवश्यक आहे. या दोन्ही पक्षांना व त्यांच्या वकिलांना योग्य संरक्षण पुरविण्यात यावे.या खटल्याच्या कामकाजात वकिलांकडून अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे याचिकादाराने म्हटले आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, वकिलांकडून असे वर्तन झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कथुआ बलात्कार प्रकरणाचा तपास जम्मू-काश्मीर क्राइम ब्रँचकडून काढून घेऊन तो सीबीआयकडे सोपविला जावा तसेच बलात्कारित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत प्रतिवादी करून घ्यावे अशी विनंती मुख्य आरोपी सांझीराम व विशाल जंगरोटा यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.बालिकेवर बलात्कारगुवाहाटी : येथील एका मजुराला पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पॉस्को) त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. मुलगी घराबाहेर खेळत असताना शब्बीरने तिला आमिष दाखवून आपल्या घरी नेऊन बलात्कार केला.वातावरण कलुषितकथुआतील बलात्कारित मुलीच्या वडिलांच्या वतीने अ‍ॅड. इंदिरा जयसिंग यांनी गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले होते की, कथुआमध्ये या प्रकरणावरुन वातावरण कलुषित झाले आहे. बलात्कारितेच्या वडिलांच्या वकिलावर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे कथुआतील न्यायालयात या खटल्याचे कामकाज निष्पक्षपणे होण्याची शक्यता नाही. चंदीगढ हे जम्मू-काश्मीरला तुलनेने जवळ असल्याने तिथे हा खटला वर्ग करण्यात यावा.

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरण