भोपाळ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भोपाळ लोकसभा मतदारसंघात साध्वी प्रज्ञा सिंह यांना उतरवून भाजपाने कट्टर हिंदुत्वाचे कार्ड खेळले आहे. दरम्यान भोपाळमधील निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे. दरम्यान, पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच साध्वी प्रज्ञा सिंहकडून दिग्विजय सिंह पराभूत झाल्यास जिवंत समाधी घेईन अशी, प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देत भाजपाने भोपाळ मतदारसंघातील निवडणुकीत कथित हिंदू दहशतवादाचा मुद्दा चर्चेत आणला आहे. दरम्यान, एकीकडे साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यामागे भाजप आणि हिंदुत्ववाद्यांती ताकद आहे. तर दिग्विजय सिंह यांनाही अनेक संत महंतांकडून समर्थन मिळत आहे. दरम्यान, पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा जाहीर केला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराज म्हणाले की, ''आज अनेकजण धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. येथे सनातन धर्मामध्ये फूट पाडली जात आहे. मात्र हिंदुत्वावरून राजकारण होता कामा नये. सनातन धर्मावरून राजकारण होता कामा नये. त्यामुळे देशातील संत दिग्विजय सिंह यांच्यासोबत आहेत.''
दिग्विजय सिंह पराभूत झाले तर घेईन जिवंत समाधी, या संतांनी केली प्रतिज्ञा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 13:57 IST