शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुघलांची नावे व चिन्हे उपटून फेकून दिली पाहिजेत – शुभेंदू अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 09:42 IST

मुघल गार्डनचे (Mughal Garden) नाव बदलून अमृत उद्यान (Amrit Udyan) असे ठेवण्यात आले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव आता बदलण्यात आले आहे. मुघल गार्डनचे (Mughal Garden) नाव बदलून अमृत उद्यान (Amrit Udyan) असे ठेवण्यात आले आहे. देशाच्या अमृत ​​महोत्सवानिमित्त मुघल गार्डनचे नामकरण करण्यात आले आहे. गार्डन फुलांच्या विशेष विविधतेसाठी ओळखली जाते. 

गार्डनचे नामांतर केल्यानंतर "मुघलांची नावे आणि चिन्हे उपटून फेकून दिली पाहिजेत", असे पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी म्हणाले. दरम्यान, मुघल गार्डनचे नाव बदलून अमृत उद्यान करण्याच्या निर्णयाचे केवळ शुभेंदू अधिकारीच नव्हे, तर भाजपच्या अनेक नेत्यांनी स्वागत केले आणि ते ऐतिहासिक असल्याचे म्हटले. 

विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी म्हणाले, "त्यांनी अनेक हिंदूंना मारले, अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. केवळ मुघल गार्डनच नाही तर संपूर्ण देशातून त्यांचे नाव हटवले पाहिजे." तसेच,"बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यास आठवडाभरात ब्रिटिश आणि मुघलांची नावे हटवली जातील", असे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी म्हणाले. 

दुसरीकडे, त्रिपुरा निवडणुकीबाबत शुभेंदू अधिकारी म्हणाले की, त्रिपुरात टीएमसीची स्थिती गोव्यापेक्षा वाईट असेल. तेथे जे टीएमसी उमेदवार असतील, त्यांचे डिपॉझिट जप्त केले जाईल. तेथे लढत फक्त भाजप आणि सीपीएम-काँग्रेस आघाडीमध्येच होणार आहे. याचबरोबर, विरोधी पक्षांनी सरकारला नाव बदलण्याऐवजी नोकऱ्या देण्यावर आणि महागाई नियंत्रित करण्यावर भर द्यावा, असा सल्ला दिला. 

राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित उद्यानाचे नामकरण अमृत उद्यान असे केल्याबद्दल माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचे आभार केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटद्वारे मानले आहेत. ते म्हणाले, हे नवीन नाव केवळ आणखी एका वसाहतवादी ओळखीचा अंत दर्शवत नाही, तर अमृत काळासाठी भारताच्या आकांक्षा देखील दर्शवते. याशिवाय, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अमृत ​​उद्यानाच्या नवीन फलकाचा व्हिडिओ ट्विटवर शेअर करत स्वागत, स्वागत, स्वागत, असे म्हटले आहे. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली