शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंट - आयसीएमआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 15:10 IST

CoronaVirus : अभ्यासात एकूण 677 लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला आहे, जे लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले होते.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरोधात लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याची किंवा मृत्यूची शक्यता कमी झाली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकत्याच केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. आयसीएमआरने अभ्यासात 677 लोकांचा समावेश केला. त्यापैकी केवळ 9.8 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्गाची माहिती मिळविण्यासाठी आयसीएमआरने हा अभ्यास केला.

अभ्यासात एकूण 677 लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला आहे, जे लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले होते. 677 लोकांपैकी 592 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. यापैकी 527 जणांनी कोव्हिशिल्ड लस घेतली होती तर 63 जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. तर 85 लोकांना लसीचा एकच डोस देण्यात आला होता. ही माहिती 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून गोळा करण्यात आली होती.

या अभ्यासादरम्यान फक्त 9.8 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर 0.4 टक्के म्हणजेच 3 लोक दोन्ही डोस घेतल्यानंतरही मरण पावले. देशात दुसर्‍या लाटेत जास्तीत जास्त डेल्टा प्रकारामुळे लोकांना संसर्ग झाला. अभ्यासात सामील लोकांपैकी 384 लोकांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. 86.69 टक्के म्हणजे 443 लोकांना डेल्टा, अल्फा, कप्पा, डेल्टा AY.1 आणि डेल्टा AY.2 ची लागण झाली होती. 

मोदी सरकारकडून मोठी ऑर्डर; 14 हजार कोटींमध्ये खरेदी करणार लसीचे 'इतके' डोस!भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला वेग आला आहे. केंद्र सरकार लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे तब्बल 14 हजार 505 कोटी रुपयांचे जवळपास 66 कोटी डोस खरेदी करणार आहे. यामुळे निश्चित देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढेल. तसेच, ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच देशाला लसींचे 66 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. या डोसमुळे वर्षाअखेरीपर्यंत देशातल्या 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यास मदत होणार आहे. आत्तापर्यंत एकूण 39 कोटी 53 लाख 43 हजार 767 नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे.

 

'या' महिन्याच्या अखेरीस येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, ICMR चा इशाराभारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट संपताच तिसऱ्या लाटेचा धोका वाढू लागला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) डिव्हिजन ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिकेबल डिजीजचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोना व्हायरसची तिसरी लहर येण्याची भीती व्यक्त केली आहे. डॉक्टर समीरन पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते यावेळी म्हणाले.   

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या