शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Job Alert: ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; पीओ, क्लार्कच्या हजारो पदांसाठी IBPS चे नोटिफिकेशन जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 12:58 IST

IBPS RRB Recruitment 2021: अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार ibps.in जाऊन अर्ज करू शकतात. अप्लाय करण्याची शेवटची तारीख 28 जून, 2021 आहे. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली लिंक देणार आहोत.

IBPS RRB Recruitment Notification 2021 Download: इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने आरआरबी ऑफिसर्स (स्केल 1, 2, 3) आणि ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पज) पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. आयबीपीएसच्या ऑफिशिअल वेबासाईटवरून आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. (IBPS Regional Rural Bank (RRB) has activated the online application link for the post of Officers Scale-I (PO), Office Assistant - Multipurpose (Clerk) and Officers Scale II & III under CRP RRB X)

अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार ibps.in जाऊन अर्ज करू शकतात. अप्लाय करण्याची शेवटची तारीख 28 जून, 2021 आहे. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली लिंक देणार आहोत. अर्ज कसा करावा यासाठी वेबसाईटवर गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत, त्या नीट वाचाव्या लागणार आहेत. (How to apply for IBPS RRB PO/Clerk Recruitment Online)

ऑफिस असिस्टंट - 5134 पदेऑफिसर स्केल 1  - 3876 पदेऑफिसर स्केल 2 आणि 3 - 1283 पदे

IBPS RRB PO/Clerk Recruitment 2021: आयबीपीएस कॅलेंडरनुसार या पदांसाठी ऑगस्ट 2021 मध्ये प्राथमिक परीक्षा घेतली जाणार आहे. जे उमेदवार या परीक्षेत पास होतील, त्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलविण्यात येणार आहे. ऑफिसर्स स्केल 1 (पीओ) मुख्य परीक्षा 25 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजिक केली जाणार आहे. ऑफिस असिस्टंट (क्लर्क) पदांची मुख्य परीक्षा 3 ऑक्टोबर, 2021 ला आणि ऑफिसर स्केल 2 और 3 साठी परीक्षेचे 25 सप्टेंबर, 2021 ला आयोजन केले जाणार आहे. 

 शिक्षण आणि वयाची अट...आरआरबी ऑफिसर्स (स्केल 1, 2, 3) आणि ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) साठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. पदांनुसार याची माहिती नोटिफिकेशन लिंकमध्ये देण्यात आली आहे. 

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) साठी वयाची अट 18 ते 28 वर्षेऑफिसर स्केल 1 (असिस्टंट मॅनेजर) वयाची अट 18 ते 30 वर्षेऑफिसर स्केल 2 (मॅनेजर) वयाची अट 21 ते 32 वर्षे ऑफिसर स्केल 3 (सीनियर मॅनेजर) वयाची अट 20 ते 40 वर्षे (सर्व वय 1 जून, 2021 नुसार मोजले जाणार)

महत्वाच्या लिंक....ऑफिस असिस्टंट भरतीसाठी इथे क्लिक करा...ऑफिसर स्केल 1  भरतीसाठी इथे क्लिक करा...ऑफिसर स्केल 2 आणि 3 भरतीसाठी इथे क्लिक करा...

IBPS RRB X - 10293 ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर (स्केल 1, 2, 3) पदांसाठी जाहिरातीची डाऊनलोड लिंकसाठी इथे क्लिक करा.... 

टॅग्स :bankबँकjobनोकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रgovernment jobs updateसरकारी नोकरी