शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयबी अधिकाऱ्याने दिली बाॅम्बची खाेटी माहिती; पाेलिसांसाेबत संयुक्त चाैकशीनंतर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 06:01 IST

दाेन महिन्यांमध्ये विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्रच सुरू झाले हाेते. ८०० पेक्षा जास्त विमानांसंदर्भात अशा धमक्या प्राप्त झाल्या हाेत्या.

रायपूर : गेल्या दाेन महिन्यांमध्ये विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्रच सुरू झाले हाेते. ८०० पेक्षा जास्त विमानांसंदर्भात अशा धमक्या प्राप्त झाल्या हाेत्या. यासंदर्भात काही जणांना अटक करण्यात आली. मात्र, त्यात एक जण गुप्तचर विभागाचा (आयबी) असल्याचे उघडकीस आले आहे. अनिमेष मंडल, असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडल यांनी १४ नाेव्हेंबरला नागपूर-काेलकाता इंडिगाेच्या विमानात बाॅम्ब ठेवण्यात आल्याची माहिती चालक दलाला दिली हाेती. त्यानंतर विमानाचे छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले. विमानात १८७ प्रवासी हाेते. तपासानंतर बाॅम्बची माहिती चुकीची निघाली. त्यानंतर मंडल यांना खाेटी माहिती दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली. 

मंडल हे उपाधीक्षक दर्जाचे अधिकारी असून, ते नागपुरात तैनात आहेत. ते निर्दाेष असून, त्यांना प्राप्त झालेली माहिती दिल्याचे काम त्यांनी केले, असे त्यांचे वकील फैझल रिझवी यांनी सांगितले. मात्र, रायपूरचे वरिष्ठ पाेलिस अधीक्षक संताेष सिंह यांनी सांगितले की, पाेलिसांनी त्याच दिवशी याबाबत आयबीला माहिती दिली हाेती. त्यानंतर मंडल यांची संयुक्त चाैकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. मंडल यांनी प्रवाशांमध्ये दहशत पसरविली, असे सिंह यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

छत्तीसगडमध्ये खटला चालणार नाही? पाेलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय न्याय संहिता व नागरी विमान वाहतूक सुरक्षा अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.त्यासाठी विशेष न्यायालयाची गरज असते. ते छत्तीसगडमध्ये नाही.  तर, जामीन आणि प्रकरण स्थानांतरीत करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेऊ, असे मंडल यांच्या वकिलांनी सांगितले.