शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी! वीज विभागात नोकरी करणारा झाला 'कलेक्टर'; अनेक वर्षांच्या कष्टाचं मिळालं फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 14:53 IST

IAS Pradeep Dwivedi : प्रदीप हे बुंदेलखंडचे रहिवासी असून ते एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी होती.

आयएएस अधिकारी बनणं हे खूप कठीण आहे, जर एखाद्याने कठोर परिश्रम केले तर हे नक्कीच होऊ शकतं. काही जण पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होतात तर काहींना अनेक प्रयत्नांनंतर यश मिळते. असेच एक अधिकारी म्हणजे प्रदीप द्विवेदी. ज्यांनी तिसर्‍या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात 74 वा क्रमांक मिळवला आहे. अनेक वर्षांच्या कष्टाचं त्यांना फळ मिळालं आहे. 

प्रदीप हे बुंदेलखंडचे रहिवासी असून ते एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी होती. प्रदीप यांनी हिंदी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण गावातूनच केले. प्रदीप यांनी लहानपणी खूप संघर्ष केला आणि भोपाळमधून इंजिनीअरिंग करण्याचा निर्णय घेतला. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना मध्य प्रदेश वीज विभागात नोकरी मिळाली.

काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी फक्त दोनदाच UPSC मध्ये बसायचे ठरवले, त्यांनी आधीच निर्णय घेतला होता. मात्र, त्यांनी जे लक्ष्य ठेवले होते ते साध्य करण्यासाठी त्यांना तिसरा प्रयत्न करावा लागला. प्रदीप यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा त्याला ती क्लिअर करता आली नाही. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याची रँक 491 होती, मात्र ते त्याच्या रँकवर समाधानी नव्हते. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि तिसऱ्यांदा ऑल इंडिया रँक 74 मिळवला.

प्रदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, तयारी सुरू करण्यापूर्वी वेबसाईटवर यूपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि पॅटर्न तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार, तुम्ही अभ्यासासाठी तयारी करणे सुरू करू शकता. सुरुवातीला फॉर्मल प्रशिक्षणाची गरज नाही, परंतु मेनसारख्या परीक्षांसाठी फॉर्मल प्रशिक्षणाचा पर्याय निवडला जाऊ शकतो. यूपीएससीची तयारी करताना त्यांनी सेल्फ स्टडीववर फोकस केला आणि त्याला अधिक महत्त्व दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"