शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'तिने' करून दाखवलं! IAS होण्यासाठी 6 महिने स्वतःला खोलीत बंद केलं अन् अभ्यासात झोकून दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 15:35 IST

आयएएस अधिकारी निधी सिवाच यांचा प्रवास हा असाच प्रेरणादायी आहे. त्यांनी UPSC परीक्षा पास होण्यासाठी 6 महिने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं आणि अभ्यास केला. 

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे आणि जे ही परीक्षा उत्तीर्ण करतात त्यांना IAS अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते. इच्छुक उमेदवार UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि त्यापैकी काही त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी खरोखर कठोर परिश्रम करतात. आयएएस अधिकारी निधी सिवाच यांचा प्रवास हा असाच प्रेरणादायी आहे. त्यांनी UPSC परीक्षा पास होण्यासाठी 6 महिने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं आणि अभ्यास केला. 

निधी यांच्या घरच्यांची इच्छा होती की त्यांनी लग्न करावं. एकतर यूपीएससी पास कर किंवा लग्न कर अशी अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. निधी यांनी कुटुंबाची ही अट मान्य केली. त्यांनी ठरवले की यावेळी आपल्याला आयएएसची परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. निधी सिवाच यांना त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले कारण त्यांनी 2018 मध्ये तिसर्‍या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 83 ची ऑल इंडिया रँक मिळवली. 

निधी यांची आयएएस पदासाठी निवड झाली. निधी सिवाच या हरियाणातील गुरुग्रामच्या रहिवासी आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत त्याने 95 टक्के आणि 90 टक्के गुण मिळवले होते. त्या दीनबंधू छोटूराम युनिव्हर्सिटी, सोनीपत, हरियाणा येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केलेलं आहे.

इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर निधी, टेक महिंद्रामध्ये डिझाईन इंजिनीअर म्हणून काम करण्यासाठी हैदराबादला गेल्या. परंतु 2017 मध्ये नोकरी सोडली आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. निधी यांनी पर्यायी विषय म्हणून इतिहास आणि पर्यायी माध्यम म्हणून इंग्रजी निवडले. निधी यांनी पर्यायी विषय म्हणून इतिहास निवडण्याचा निर्णय घेतला कारण त्यांनी सांगितले की त्यांच्या नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमाने खूप मदत केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"