शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
2
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
3
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
4
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
5
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
6
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
7
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
8
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
9
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
10
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
11
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
12
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
13
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
14
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
15
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
16
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
18
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
19
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

स्वयंघोषित 'कल्की भगवान' यांच्या आश्रमांवर छापा, 409 कोटींच्या संपत्तीवर टाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 13:22 IST

प्राप्तिकर विभागाने भगवान कल्कींचे अवतार सांगणाऱ्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुच्या आश्रमावर छापा टाकला असून तब्बल 409 कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देप्राप्तिकर विभागाने भगवान कल्कींचे अवतार सांगणाऱ्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुच्या आश्रमावर छापा टाकला आहे.तब्बल 409 कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.कल्की यांच्या आश्रमांवर जमिनी हडपण्याचा आणि कर चुकवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने भगवान कल्कींचे अवतार सांगणाऱ्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुच्या आश्रमावर छापा टाकला असून तब्बल 409 कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: ला कल्की भगवान म्हणवणाऱ्या विजय कुमार नायडू यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांवर छापा टाकण्यात आला आहे. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कल्की भगवान आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांच्या आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये असलेल्या विविध आश्रमांवर छापा टाकण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत 40 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. 

कल्की यांच्या आश्रमांवर जमिनी हडपण्याचा आणि कर चुकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. कल्की यांच्या नावावर एक विद्यापीठ आणि आध्यात्मिक शाळा देखील आहे. आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील वैरादेहपलेममध्ये त्यांचा मुख्य आश्रम आहे. बंगळुरू येथील आश्रमावर छापा टाकण्यात आल्यावर तब्बल 93 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. तसेच इतर ठिकाणी मारण्यात आलेल्या छाप्यामध्ये 409 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. 

कल्की यांनी एलआयसीचा क्लार्क म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर 1989 मध्ये चित्तूर विजय कुमार यांनी आपण भगवान विष्णूचा दहावा अवतार असल्याचा दावा केला आहे. यानंतर त्यांच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. त्यांच्या दर्शनासाठी भक्तांना 5 हजारापासून 25 हजारे रुपये खर्च करावे लागतात. तसेच त्यांच्या संस्थेकडून देण्यात येणाऱ्या पावत्यांमध्ये हेराफेरी केली जात असून ते पैसे रिअल इस्टेटमध्ये वापरले जात होते. प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात अनेक गैरव्यवहार समोर आले आहेत. 

भारतासोबतच कल्की यांच्या संस्थांनी चीन, अमेरिका, सिंगपूरमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याजवळ बेहिशेबी मालमत्ता देखील मोठ्या प्रमाणात आहे. कल्की यांच्या आश्रमांवर जमिनी हडपण्याचा आणि कर चुकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 40 हून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये जवळपास 18 कोटी रुपयांचे परदेशी चलन, 88 किलो सोने-चांदीचे दागिने सापडले आहेत. दागिन्यांची किंमत ही जवळपास 26 कोटी आहे. 1271 कॅरेटचे म्हणजेच पाच कोटींचे हिरे देखील प्राप्तिकर विभागाला सापडले आहेत. का हिंदी वेबसाईटने याचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स