शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"मी देशाचे रक्षण केले, पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 06:15 IST

विवस्त्र धिंड काढलेल्या महिलेचा पती तसेच माजी लष्करी जवानाची खंत

इम्फाळ : मणिपूरमध्ये गेल्या ४ मे रोजी विवस्त्र धिंड काढण्यात आलेल्यांपैकी एका महिलेचा पती भारतीय लष्कराचा माजी जवान आहे. त्यांनी अतिशय दु:खाने सांगितले की, मी मातृभूमीचे रक्षण केले पण स्वत:च्या पत्नीला वाचवू शकलो नाही. 

आसाम रेजिमेंटमधील माजी सुभेदार असलेल्या या व्यक्तीने सांगितले की, मी कारगिल युद्धामध्ये लढलो आहे. भारतीय शांती सेनेचा एक भाग म्हणून मी श्रीलंकेतही अनेक दिवस होतो. मी माझ्या देशाचे संरक्षण केले. पण, मी लष्करातून निवृत्त झाल्यानंतर माझे घर, पत्नी, गावकरी यांपैकी कोणाचेही रक्षण करू शकलो नाही. त्याचे मला खूप दु:ख वाटते. 

त्यांनी म्हटले आहे की, ४ मे रोजी सकाळी आमच्या गावातील अनेक घरे संतप्त जमावाने जाळली. दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची गावातील रस्त्यांवरून धिंड काढण्यात आली. त्यावेळी पोलिस तिथे हजर होते पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. ज्यांनी गावकऱ्यांची घरे जाळली, महिलांसोबत अतिशय घाणेरडे कृत्य केले, त्या लोकांना अतिशय कडक शिक्षा देण्यात यावी. 

‘केंद्राने मणिपूरमध्ये पाहणी पथके का पाठविली नाहीत?’वांशिक संघर्ष सुरू असलेल्या मणिपूरमध्ये पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पथके का पाठविली नाहीत. भाजपच्या बेटी बचाओ या योजनेचे आता बेटी जलाओ योजनेत रूपांतर झाले आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

महिला आयोगाला शून्य प्रतिसादn मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने गेल्या तीन महिन्यांत तीनदा स्पष्टीकरण मागूनसुद्धा त्या राज्याचे सरकार व अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा दावा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केला आहे. n ४ मे रोजी मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याची व अन्य काही प्रकरणांची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे १२ जून रोजी करण्यात आली होती.  विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली, असे रेखा शर्मा यांनी सांगितले. 

जेव्हापासून मणिपूरचा व्हिडीओ पाहिला आहे तेव्हापासून मी ना झोपू शकले ना मला जेवण जात आहे. मला खूप राग आणि वेदना होत आहेत. महिला आणि लहान मुलांची सुरक्षा ही कोणत्याची सरकारची प्राथमिकता असायला हवी.    - सेलिना जेटली, अभिनेत्री

ही भयंकर व लाजिरवाणी घटना आहे. त्या घटनेचा देशभरात निषेध होणे आवश्यक आहे. गुन्हा घडून ७७ दिवस उलटल्यानंतरही पीडित महिलांना न्याय मिळत नाही हे अतिशय गंभीर आहे. मणिपूरच्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून आवाज उठविण्याची गरज आहे.    - प्रियांका चोप्रा, अभिनेत्री

मणिपूरमधील गंभीर परिस्थितीमुळे मी अतिशय चिंतेत आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत अपराधांना क्षमा करण्याच्या सर्व शब्दांना काहीच अर्थ नाही.    - करीना कपूर, अभिनेत्री

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSocial Viralसोशल व्हायरलIndian Armyभारतीय जवान