शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘यापुढे आय बेग म्हणण्याची गरज नाही’ - एम. व्यंकया नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:19 IST

सभागृहात कागदपत्रे सादर करताना कोणत्याही सदस्याने व मंत्र्यांनी यापुढे ‘मी परवानगी घेतो’ (आय बेग टू) असा शब्दप्रयोग करू नये, असे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकया नायडू यांनी शुक्रवारी म्हटले.

नवी दिल्ली : सभागृहात कागदपत्रे सादर करताना कोणत्याही सदस्याने व मंत्र्यांनी यापुढे ‘मी परवानगी घेतो’ (आय बेग टू) असा शब्दप्रयोग करू नये, असे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकया नायडू यांनी शुक्रवारी म्हटले.सभापती झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दिवस होता. सदस्य व मंत्र्यांनी म्हणायचे आहे ते एवढेच की, यादीतील कागदपत्रे मी सभागृहात मांडण्यासाठी उभा राहतो, असे सांगून नायडू म्हणाले की, परवानगी घ्यायची गरज नाही. हा स्वतंत्र भारत देश आहे.मंत्र्यांना त्यांच्याकडील कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आल्यावर मंत्र्यांनी आजच्या कामकाजाच्या सुधारित यादीनुसार माझ्या नावापुढे असलेली कागदपत्रे सादर करण्याची परवानगी मी मागतो (आय बेग टू ले आॅन द टेबल द पेपर्स लिस्टेड अगेन्स्ट माय नेम) अशा शब्दांत सुरुवात करताच नायडू यांनी वरील निरीक्षण नोंदवले. नायडू यांनी लगेचच खुलासा केला की, ही केवळ सूचना आहे, आदेश नाही.विरोधकांनी केला निषेध-‘पाकिस्तानसोबतचा कट’ या शब्दप्रयोगाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करून क्षमा मागावी ही राज्यसभेत विरोधकांनी शुक्रवारी दिलेली नोटीस फेटाळल्याचा निषेध केला.मोदी यांनी जे वक्तव्य केले त्याचा संबंध माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशीहोता.सभागृहाबाहेर वार्ताहरांशी बोलताना विरोधकांनी सांगितले की, मोदी यांचे ते वक्तव्य दुर्दैवी होते व नोटिसीवर चर्चा करण्यास अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी दिलेला नकार निराश करणारा होता.विरोधी नेत्यांनी जनता दलाचे (संयुक्त) बंडखोर नेते शरद यादव व अली अन्वर अन्सारी यांना राज्यसभा सदस्यपदासाठी अपात्र ठरवण्याच्या निर्णयालाही आक्षेप घेतला.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू