शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

'IB चा रिपोर्ट आला तेव्हा तुम्ही झोपला होता का? तुम्ही हिंसाचार थांबवायला हवा होता', असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 18:47 IST

Gujarat Ram Navami Violence: गेल्या 20-25 वर्षांच्या चौकशी आयोगाचा अहवाल सांगतो की, राज्य सरकारांची इच्छा नसेल तर हिंसाचार पसरत नाही, असे भाष्य गुजरातमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसी यांनी केले. 

नवी दिल्ली : हिंसाचार होत असेल तर तो कोणासाठीही योग्य नाही. हिंसाचार झाला तर त्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. गेल्या 20-25 वर्षांच्या चौकशी आयोगाचा अहवाल सांगतो की, राज्य सरकारांची इच्छा नसेल तर हिंसाचार पसरत नाही, असे भाष्य गुजरातमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसी यांनी केले. 

हिंसाचार ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. आरोपींना अटक करून योग्य तपास करून कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे. तुमच्याकडे आयबी रिपोर्ट होता तर तुम्ही का झोपले होते? तुम्ही त्याचा पर्दाफाश करायला हवा होता, तिथे पोलिस बंदोबस्त तैनात करून हिंसाचार थांबवायला हवा होता. तुमची गुंतागुंतीची वागणूक लपविण्यासाठी तुम्ही संध्याकाळी कथा आणता. अशा कथा आता जुन्या झाल्या आहेत, असेही म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी गुजरात राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 

याचबरोबर, किती दिवस तुम्ही जुन्या गोष्टी समोर आणत राहणार? आपले अपयश स्वीकारा. तुम्ही स्वतः सहभागी आहात. भजने वाजवली पाहिजेत, पण कसल्या घोषणा दिल्या? 50-100 तलवारी फिरवण्यात आल्या. पोलिसांच्या उपस्थितीत हे करण्यात आले. सरकारला हिंसाचार हवा होता आणि त्यात मिलीभगत आहे, असा आरोपही असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. 

हिंसाचारात 11 जणांचा सहभाग रविवारी रामनवमीच्या दिवशी उसळलेल्या हिंसाचार आणि जाळपोळीबाबत गुजरात पोलिसांनी बुधवारी मोठा खुलासा केला आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. खंभातमध्ये झालेल्या हिंसाचारात स्लीपर मॉड्यूलखाली कट रचण्यात आला होता. दरम्यान, या हिंसाचारात 11 जणांचा सहभाग आहे. आरोपी परदेशात बसलेल्या लोकांच्या संपर्कात होते. आरोपींनी 3 दिवस बैठक घेऊन कट रचला होता. रझाक नावाच्या मौलवीने या हिंसाचाराची योजना आखली होती. 11 गुन्हेगारांची चौकशी सुरू आहे, असे एसपी अजित राजियन यांनी सांगितले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीGujaratगुजरात