शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"मी लष्कराच्या कमांडरला युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले"; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:39 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती पाहता भारत आणि जगात शांतता राखण्यासाठी आपण युद्धासाठी सदैव तयार असले पाहिजे, असे मी लष्कराला सांगितले.

'भारत नेहमीच शांततेचा उपासक राहिला आहे आणि राहील, सध्याची जागतिक परिस्थिती पाहता आपण युद्धासाठी सदैव तयार असले पाहिजे, असे मी लष्कराच्या कमांडरना सांगितले, असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. आज राजनाथ सिंह यांनी माध्यमांसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली. 

माध्यमांसोबत बोलताना सिंह म्हणाले, "जगातील भारत हा एकमेव देश आहे या देशाने 'वसुधैव कुटुंबकम'चा संदेश दिला आहे. भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे. भारत नेहमीच शांतीचा उपासक आहे, होता आणि राहील. पण आजच्या जागतिक परिस्थितीचा विचार करून मी माझ्या लष्कराच्या कमांडर्सना सांगितले होते की, जगात आणि भारतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण सदैव युद्धासाठी तयार असले पाहिजे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत आपली शांतता भंग पावू नये.

आता राजकीय 'दंगल' होणार! विनेश फोगट करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, 'या' जागेवरून निवडणूक लढवणार?

काही दिवसापूर्वी लखनौमध्ये लष्कर कमांडर्सची  परिषद झाली, यावेळी सिंह यांनी रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्ष आणि बांगलादेशातील सद्यस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी कमांडरना या घटनांचे विश्लेषण करण्यासाठी, भविष्यात देशाला भेडसावणाऱ्या समस्यांचा अंदाज घ्या आणि सामोरे जाण्यासाठी तयार रहा. उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती आणि शेजारील देशांमधील घडामोडी लक्षात घेऊन सर्वोच्च लष्करी नेतृत्वाने सर्वसमावेशक आणि सखोल विश्लेषण करण्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.

राजनाथ सिंह म्हणाले, “जागतिक अस्थिरता असूनही, भारत तुलनेने शांततेच्या वातावरणात शांततेने विकसित होत आहे. मात्र, आव्हानांच्या वाढत्या संख्येमुळे आपण सतर्क राहण्याची गरज आहे. अमृतकाळात आपण आपली शांतता राखणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, वर्तमानात आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवले पाहिजे आणि भविष्याभिमुख होण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्याकडे मजबूत राष्ट्रीय सुरक्षा घटक असणे आवश्यक आहे. आपच्याकडे अतुलनीय प्रतिकार क्षमता असली पाहिजे, असंही सिंह म्हणाले. 

राजनाथ सिंह यांनी डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याचे आवाहनही लष्करी नेतृत्वाला केले. "हे घटक कोणत्याही संघर्षात किंवा युद्धात प्रत्यक्ष सहभागी होत नाहीत. त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग युद्धाचा मार्ग ठरवत असतो, असंही राजनाथ सिंह म्हणाले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndian Armyभारतीय जवान