शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दिल्लीत मराठी पेपर वाचण्याची मज्जाच वेगळी - सचिन तेंडुलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 07:36 IST

‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीचा गुरुवारी शुभारंभ झाला अन् पहिल्या दिवसाचा अंक शुक्रवारी दिल्लीतील मराठी जनांच्या हाती पडला. दिल्ली विमानतळावर मराठी पेपर पाहून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही आनंदित झाला.

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीचा गुरुवारी शुभारंभ दिल्लीत मराठी पेपर वाचण्याची मज्जाच वेगळी - सचिन तेंडुलकरतब्बल ६६ हजारांहून अधिक नेटक-यांनी केले लाइक

नवी दिल्ली : ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीचा गुरुवारी शुभारंभ झाला अन् पहिल्या दिवसाचा अंक शुक्रवारी दिल्लीतील मराठी जनांच्या हाती पडला. दिल्ली विमानतळावर मराठी पेपर पाहून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही आनंदित झाला. ‘‘दिल्ली एअरपोर्ट लाउंजमध्ये मराठी पेपर वाचण्याची मज्जाच वेगळी...’’ अशा ओळींसह सचिनने हा फोटो इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला. या फोटोला इन्स्टाग्रामवर दीड लाखांहून अधिक, तर ट्विटरवर तब्बल ६६ हजारांहून अधिक नेटक-यांनी लाइक केले आहे. 

देशाची राजधानी दिल्लीत लोकमतच्या दिल्ली आवृत्तीचा शुभारंभ सोहळा गुरुवार, १४ डिसेंबर रोजी सायंकाळी उत्साहात संपन्न झाला. यावेळी भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह, राज्यसभा उपसभापती पी.जे. कुरियन, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पोलादमंत्री चौधरी विरेंद्रसिंह चौधरी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. 

मातृभाषेतच बोला! उपराष्ट्रपतींचे आवाहन‘जन्म देते ती माता, जिथे जन्म लाभतो ती जन्मभूमी, जिचा वारसा लाभतो ती मातृभूमी, आणि जी मातेच्या गर्भात आपल्या व्यक्तिमत्वाशी जोडली जाते, ती मातृभाषा या चार गोष्टींचा सन्मान हेच कोणाही व्यक्तीचे सर्वोच्च जीवनमूल्य असायला हवे. परभाषा जरूर शिकाव्यात, त्यांचा आदर करावा, पण प्रत्येकाने आपल्या घरी मातृभाषेतच बोलले पाहिजे’ असे ठामपणे सांगत भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीच्या शुभारंभाला प्रादेशिक भाषांच्या अस्मितेची धार दिली आणि लोकमत समूहाचा उत्तरेकडील दिग्विजयी प्रवास समारंभपूर्वक सुरू झाला.

वर्तमान परिस्थितीमध्ये माध्यमांची जबाबदारी वाढली - डॉ. मनमोहन सिंगलोकशाहीत प्रसारमाध्यमांची मोठी जबाबदारी आहे. वर्तमान परिस्थितीत ही जबाबदारी अजून वाढलीच आहे, अशी भावना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या बैठकीचा संदर्भ देत मनमोहनसिंग यांच्या राष्ट्रनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह लावले होते. त्या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग माध्यमांच्या कार्यक्रमात काय बोलतात, याकडे उपस्थित सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र त्या वादाचा उल्लेखही न करता डॉ. सिंग यांनी माध्यमांनी सत्याची कास धरावी असे आवाहन केले.

नागपूर ते दिल्ली हा लोकमतचा प्रवास अभिमानास्पद - नितीन गडकरीदेशाचे ह्रदय असलेल्या दिल्लीतून लोकमत आपली सुरुवात करत आहे, याचा आनंद आहे. आता महाराष्ट्राच्या बातम्या दिल्लीत वाचायला मिळतील, असे सांगून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, शेतक-यांच्या समस्या असो की बेरोजगारी, लोकमतने नेहमीच संवेदनशील विषयांना हात घातला आहे. त्यामुळे लोकमत मराठी अस्मितेचे प्रतीक बनला आहे.लोकमतच्या यवतमाळापासूनच्या प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत. नागपूरकर म्हणून हा प्रवास अभिमानास्पद वाटतो, असे सांगत गडकरींनी लोकमतसोबतचे ऋणानुबंध व्यक्त केले. दिल्लीमध्ये लोकमत महत्त्वाची भूमिका यशस्वीपणे पार पाडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकमतचे दिल्लीत स्वागत असो - केजरीवालमुख्यमंत्री या नात्याने लोकमतचे मी दिल्लीत मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. माध्यमांची तटस्थ भूमिका घ्यायला हवी. आजच्या काळात ते अधिक आवश्यक आहे. लोकमतने महाराष्टÑ व गोवा गाजवला. आता ते दिल्ली काबीज करण्यासाठी आले आहेत. लोकमतने राजधानीत मराठी लोकांना एकत्र करुन त्यांचा दिल्लीतील आवाज बुलंद करावा, मुख्यमंत्री म्हणून लागेल ती मदत करेन, असे आश्वासनही केजरीवाल यांनी दिले.

दिग्गजांची उपस्थिती!माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह, राज्यसभा उपसभापती पी.जे. कुरियन, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पोलादमंत्री चौधरी विरेंद्रसिंह चौधरी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, लोकमत मीडिया लि.चे अध्यक्ष विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी, विविध देशांच्या वकिलातींचे प्रतिनिधी, ज्येष्ठ उद्योगपती व महाराष्टÑाची सरहद्द ओलांडून यमुनेतीरी संसार थाटलेल्या मराठी कुटुंबांच्या नव्या-जुन्या पिढ्यांचे अनेक प्रतिनिधी उत्साहाने सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकरLokmat Marathi Delhi Editionलोकमत मराठी दिल्ली आवृत्ती