शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार व्हायला मी मूर्ख नाही : नितीश कुमार

By admin | Updated: May 15, 2017 20:32 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार राहणार नसल्याचं आज स्पष्ट केलं.

ऑनलाइन लोकमत
 
पाटणा, दि. 15 - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी  2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार राहणार नसल्याचं आज स्पष्ट केलं. नरेंद्र मोदींमध्ये जनतेला क्षमता दिसली त्यामुळेच आज ते देशाचे पंतप्रधान आहेत. ज्याची क्षमता लोकं ओळखतील तोच देशाचा पंतप्रधान होईल  असंही ते म्हणाले. 
 
आम्ही इतके मूर्ख नाहीत, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नसेल असं  पाटणामध्ये  "लोक संवाद कार्यक्रमात ते म्हणाले. पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता नितीश म्हणाले,  मी 2019 मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. माझा पक्ष खूप लहान असून मला बिहार चालवण्यासाठी जनतेने कौल दिला आहे. ज्याच्यात क्षमता असेल तोच पंतप्रधान बनेल , 5 वर्षांपूर्वी मोदी पंतप्रधान बनतील असा विचार कोणी केला होता का, पण लोकांना त्यांच्यामध्ये क्षमता दिसली म्हणून आज ते पंतप्रधान आहेत, असे त्यांनी नमूद केले. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.  
 
 2019 मध्ये भाजपविरोधात बिहारच्या धर्तीवर महाआघाडीची स्थापना करणार का या प्रश्नावर नितीशकुमार म्हणतात, भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. पात्रता आणि क्षमता असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळू शकते. योग्य वेळी त्या उमेदवाराला पुढे आणले जाईल असेही नितीशकुमारांनी स्पष्ट केले. 
 
नितीश कुमारांच्या या स्पष्टीकरणामुळे 2019 च्या लोकसभा निवडणूकीत ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असण्याच्या चर्चांना सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे.