पाणपोई उरल्या नावाला....
By admin | Updated: March 22, 2016 00:40 IST
जळगाव : उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ठिकठिकाणी पाणपोई उभारल्या जातात. मात्र त्यांची कधी दुरवस्था असते तर कधी तेथे पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. अशाच प्रकारे शहरातील काही पाणपोईंची अवस्था झालेली आहे.
पाणपोई उरल्या नावाला....
जळगाव : उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ठिकठिकाणी पाणपोई उभारल्या जातात. मात्र त्यांची कधी दुरवस्था असते तर कधी तेथे पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. अशाच प्रकारे शहरातील काही पाणपोईंची अवस्था झालेली आहे.गणेश कॉलनीत पाणपोईला कुलूप..गणेश कॉलनी भागातील पाणपोई चांगल्या स्थितीत आहे, मात्र तिला सध्या कुलूप लावलेले आहे. त्यामुळे या भागात अनेकजण पाणी पिण्यासाठी येतात मात्र कुलूप पाहून त्यांना परत जावे लागते. जिल्हा रुग्णालयात काही नळ बंद...जिल्हा रुग्णालयात समोरच्या बाजूला संत गरीबदास चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने उभारण्यात आलेली पाणपोई उत्तम स्थितीत असून तेथे पाणीही उपलब्ध असते. मात्र रुग्णालय परिसरात दुसर्या बाजूला असलेल्या पाणपोईचे काही नळ बंद आहे. एका बाजूला असलेल्या तीन नळांपैकी एकच नळ सुरू आहे तर इतर बाजूंचेही नळ बंद आहे. बसस्थानक परिसरात पाणपोईत अन्न...बसस्थानक परिसरात असलेल्या पाणपोईमध्ये पाणी उपलब्ध आहे. आजूबाजूला स्वच्छताही असते, मात्र पाणपोईवर पाणी पिताना प्रवासी तेथेच हात धुतात व डब्यातील उष्टे अन्नही तेथेच टाकतात. त्यामुळे तेथे कधीकधी पाणी वाहत नाही. पुष्पलता बेंडाळे चौक, क्रीडा संकुल परिसर...पुष्पलता बेंडाळे चौकामध्ये पाण्याच्या सोयीसाठी माठ ठेवण्यात आले आहे. मात्र त्यात पाणीच नसल्याने येणार्या-जाणार्या नागरिकांना त्याचा काही फायदा होत नाही. क्रीडा संकुल परिसरातदेखील अशीच अवस्था आहे. येथे पाण्याचे रांजण तर आहे, मात्र त्यात पाणीच नाही, त्यामुळे त्याचाही काही उपयोग नाही.