हैदराबाद: तेलंगणामधील हैदराबादमध्ये एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. लग्न मोडल्याच्या रागातून एका २४ वर्षीय तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीला चक्क एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले. या अघोरी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी तरुण आणि २२ वर्षीय पीडित तरुणी हे नातेवाईक आहेत. दोघांचे लग्न त्यांच्या कुटुंबीयांनी ठरवले होते. मात्र, लग्नापूर्वी तरुणीच्या पालकांना समजले की मुलाचे आई-वडील एचआयव्ही बाधित आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी मुलाचीही चाचणी केली असता, तोदेखील 'एचआयव्ही पॉझिटिव्ह' असल्याचे समोर आले. या माहितीनंतर तरुणीच्या वडिलांनी हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
'ती माझ्यासोबतच रहावी' यासाठी अघोरी पाऊललग्न मोडल्याने आरोपी तरुण प्रचंड संतापला होता. तरुणीलाही एचआयव्हीची लागण झाली, तर ती कोणाशीच लग्न करू शकणार नाही आणि शेवटी तिला माझ्याशीच लग्न करावे लागेल, या विकृत विचाराने त्याने ११ मार्च रोजी तरुणीच्या घरात शिरून तिला जबरदस्तीने संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले.
पोलीस कारवाई आणि पुढील तपासपीडित तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोचारम आयटी कॉरिडॉर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा (IPC कलम ३०७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Web Summary : In Hyderabad, a man injected his former fiancée with HIV-infected blood after she called off their wedding upon learning he was HIV-positive. He wanted to ensure she could only marry him. Police arrested him; the woman is hospitalized.
Web Summary : हैदराबाद में, एक युवक ने अपनी पूर्व मंगेतर को HIV संक्रमित खून इंजेक्ट कर दिया क्योंकि उसने उसके HIV पॉजिटिव होने का पता चलने पर शादी तोड़ दी थी। वह सुनिश्चित करना चाहता था कि वह केवल उससे ही शादी कर सके। पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया; महिला अस्पताल में भर्ती है।