शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: देवदूत! कोरोना संकटात घरमालक मदतीला धावला; ७५ कुटुंबांचं भाडं माफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 15:17 IST

coronavirus संवेदनशील घरमालकानं ३.४ लाख रुपयांवर सोडलं पाणी

कोरोनाचा फैलाव वाढत चालल्यानं अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. स्वत:चं घर नसलेल्या, भाड्यानं राहणाऱ्या कुटुंबांवर तर संकट कोसळलं आहे. भाडं कसं भरायचं, खायचं काय, अशा विवंचनेत अडकलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. अशाच काही कुटुंबांच्या मदतीला एक घरमालक अगदी देवासारखा धावून गेला आहे. हैदरामध्ये राहणाऱ्या कोडुरी बालालिंगम यांनी त्यांच्या ७५ भाडेकरुंचं घर भाडं माफ केलं आहे. त्यामुळे भाडेकरूंना संकटाच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे.बालानगरमध्ये राहणाऱ्या बालालिंगम यांच्या मालकीच्या तीन इमारती आहेत. यामध्ये ७५ भाडेकरु वास्तव्यास आहेत. यातले बहुतांश जण बिहारमधले असून ते मजुरीचं काम करतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्यासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यांची अडचण समजून घेत बालालिंगम यांनी त्यांच्याकडून भाडं न घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे बालालिंगम यांना ३.४ लाखांवर पाणी सोडावं लागलं. मात्र मजुरांची परिस्थिती समजून घेत त्यांनी स्वत:हूनच हा निर्णय घेतला.लॉकडाऊनमुळे मजुरांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे किमान घर भाडं माफ केल्यानं त्यांना थोडा दिलासा मिळेल, असा विचार माझ्या मनात आला, असं बालालिंगम यांनी सांगितलं. पुढील महिन्याचं भाडंदेखील माफ करायचं असा विचार सध्या माझ्या मनात सुरू असल्याचंही ते म्हणाले. घर भाडं माफ करण्यासोबतच त्यांनी तेलंगणा आणि आंध्पर प्रदेशातल्या २५० कुटुंबांना आर्थिक आधार दिला. त्यासाठी त्यांनी जवळपास २.५ लाख रुपये खर्च केले. मूळचे राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्याचे रहिवासी असलेले बालालिंगम १९९६ मध्ये हैदराबादला आले. त्यांनी एका कारखान्यात ९ वर्षं काम केलं. २००५ मध्ये त्यांनी स्वत:चा कारखाना सुरू केला. यामध्ये सध्या २० कामगार काम करतात. बालालिंगम यांनी अनेक मुलांना शिष्यवृत्ती दिली असून स्वत:च्या गावात जलसंवर्धन प्रकल्पदेखील सुरू केला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या