शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

Hyderabad Rape-Murder Case: त्यांनाही त्याच निर्घृणपणे जिवंत जाळा; आरोपीच्या आईची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 11:01 IST

डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या केल्या प्रकरणी चार जण अटकेत

हैदराबाद: डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची अतिशय निर्घृण हत्या केल्याचं प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. आरोपींच्या कुटुंबीयांकडूनही हीच मागणी केली जात आहे. आमच्या मुलांना फाशीची शिक्षा दिली जात असल्यास त्याला आम्ही अजिबात विरोध करणार नाही, अशी भूमिका आरोपींच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. आरोपींनी ज्या निर्घृण पद्धतीनं पीडितेला जिवंत जाळलं, त्याचप्रमाणे आरोपींनादेखील जिवंत जाळण्यात यावं, अशी मागणी एका आरोपीच्या आईनं केली आहे. डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक आरोपी सी. केशवुलु हा नारायणपेट जिल्ह्यातल्या मकठल मंडलमधल्या गुंडीगांडला गावचा रहिवासी आहे. त्याची आई श्यामलानं तीव्र शब्दांत स्वत:च्या भावना व्यक्त केल्या. आरोपींना फाशी दिली जावी किंवा जाळून टाकण्यात यावं. त्यांनी डॉक्टरसोबत जे केलं, तेच त्यांच्याही बाबतीत केलं जावं', असं श्यामला म्हणाल्या. आपण महिला डॉक्टरच्या कुटुंबाच्या वेदना समजू शकतो. मला एक मुलगी आहे. त्यामुळे त्या महिलेच्या कुटुंबावर काय प्रसंग ओढावलाय, त्याची कल्पना मी करू शकते. सगळ्या गोष्टींची जाणीव असतानाही माझ्या मुलानं अतिशय हीन कृत्य केलं. मी मुलाचा बचाव केल्यास सर्वजण आयुष्यभर माझा द्वेष करतील, असं श्यामला यांनी म्हटलं. गुरुवारी पोलिसांनी केशवुलुला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर पती घरी सोडून गेल्याचं त्यांनी सांगितलं. पाच महिन्यांपूर्वीच केशवुलुचा विवाह झाला होता. त्याला किडनीचा आजार असून त्याच्यावर ६ महिन्यांपासून उपचार सुरू असल्याची माहिती श्यामला यांनी दिली. हैदराबादमध्ये प्राण्यांच्या डॉक्टरवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरवर बलात्कार करण्यात आल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिला जाळण्यात आलं. या प्रकरणी आतापर्यंत सहाय्यक निरीक्षकासह तीन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.  

टॅग्स :Rapeबलात्कार