भोपाळ : हुंडय़ासाठी एका निर्दयी पतीने पत्नीच्या गुप्तांगात अॅसिड ओतल्याची खळबळजनक घटना मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात बुधवारी घडली़ कल्याण अहीरवार असे आरोपीचे नाव आह़े आठ वर्षापूर्वी पीडितेचा त्याच्याशी विवाह झाला होता़ 2क्क्9 पासून कल्याण पत्नीचा हुंडय़ासाठी छळ करीत होता़ गत बुधवारी कल्याणने मारहाण केली़ केवळ इतकेच नाही तर ट्रॅक्टरमधील बॅटरीतील अॅसिड काढून ते त्याने पत्नीच्या गुप्तांगात ओतल़े पत्नी वेदनांनी तडफडत असूनही रुग्णालयात नेले नाही. वेदना असह्य झाल्याने पीडिता बेशुद्ध पडली़ तिचा मृत्यू झाला, असे समजून कल्याणने तिच्या माहेरी तिने आत्महत्या केल्याचे कळविल़े सूचना मिळताच पीडितेचे कुटुंबीय तिच्या सासरी आल़े सुदैवाने याचदरम्यान पीडिता शुद्धीवर आली़