गर्भवती पत्नीवर चाकू हल्ला करणार्या पतीला बदडले
By admin | Updated: April 5, 2016 23:42 IST
जळगाव: गर्भवती पत्नीवर चाकू हल्ला करुन उपचारादरम्यानही तिला त्रास देणार्या पतीला मंगळवारी रात्री दहा वाजता जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी बदडून काढल्याचा प्रकार घडला. दीपक हंसकर असे त्याचे नाव असून रेंगोटा ता.रावेर येथील तो रहिवाशी आहे. पत्नी शोभा ही गर्भवती असून तिच्यावर त्याने चाकु हल्ला केल्याने सोमवारी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन ठिकाणी वार झाल्याने पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री दहा वाजता दीपक याने दारुच्या नशेत तिला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला समजावण्यासाठी गेलेल्या कर्मचार्यालाच त्याने कानशिलात लगावली. हा प्रकार पाहिल्यानंतर सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढले असता त्याने त्याच्याही कानशिलात लगावली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या लोकांनी त्याला बदडून काढत पोलिसांच्या स्वाधीन केल्
गर्भवती पत्नीवर चाकू हल्ला करणार्या पतीला बदडले
जळगाव: गर्भवती पत्नीवर चाकू हल्ला करुन उपचारादरम्यानही तिला त्रास देणार्या पतीला मंगळवारी रात्री दहा वाजता जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी बदडून काढल्याचा प्रकार घडला. दीपक हंसकर असे त्याचे नाव असून रेंगोटा ता.रावेर येथील तो रहिवाशी आहे. पत्नी शोभा ही गर्भवती असून तिच्यावर त्याने चाकु हल्ला केल्याने सोमवारी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन ठिकाणी वार झाल्याने पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री दहा वाजता दीपक याने दारुच्या नशेत तिला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला समजावण्यासाठी गेलेल्या कर्मचार्यालाच त्याने कानशिलात लगावली. हा प्रकार पाहिल्यानंतर सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढले असता त्याने त्याच्याही कानशिलात लगावली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या लोकांनी त्याला बदडून काढत पोलिसांच्या स्वाधीन केले.