छळाला कंटाळलेल्या महिलेने केली पतीची हत्त्या
By admin | Updated: May 5, 2014 20:56 IST
निलगिरीबाग झोपडपी : गळा आवळून ब्लेडने केले वार
छळाला कंटाळलेल्या महिलेने केली पतीची हत्त्या
निलगिरीबाग झोपडपी : गळा आवळून ब्लेडने केले वारपंचवटी : चारित्र्याचा संशय व सततच्या मारहाणीला कंटाळलेल्या पत्नीने पतीचा गळा आवळून त्यावर ब्लेडने वार करून हत्त्या केल्याची घटना औरंगाबादरोडवरील निलगिरीबाग झोपडपीत शनिवारी घडली़ या हत्त्येप्रकरणी आडगाव पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले आहे़निलगिरीबाग झोपडपीत राहणारा संजय निंबा शार्दुल (३५) याची हत्त्या झाली असून, त्याची पत्नी संशयित मंगल शार्दुलला (३०) अटक करण्यात आली आहे़ शनिवारी (दि़ ३) पती-पत्नीत वाद झाल्यानंतर दारूच्या नशेत संजय शार्दुलने गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्त्या केल्याची नोंद आडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती़ जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविल्यानंतर आलेल्या वैद्यकीय अहवालात गळ्यावर ब्लेडने वार केल्याने अतिरक्तस्त्राव तसेच गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले होते़ त्यानुसार पोलिसांनी शार्दुलची पत्नी, आई, वडील, मुले यांची सखोल चौकशी सुरू केली़ यामध्ये प्रथम सर्वांनीच असे काही घडल्याचा नकार दिला. मात्र विश्वासात घेतल्यानंतर या हत्त्येचे गूढ उकलले़मयत संजय शार्दुल याचा १३ वर्षांपूर्वी मंगल हिच्याशी विवाह झाला होता़ दारूचे व्यसन असलेला संजय घरात काही ना काही कारणावरून पत्नीशी भांडण करून मारहाण करीत असे़ दोन दिवसांपूर्वी शनिवारी संजयने दुपारी पत्नीशी भांडण केले व चारित्र्याचा संशय घेतला़ त्यानंतर संतापलेल्या पत्नीने संजयचे हात बांधून गळ्यावर ब्लेडने वार केले तसेच दोरीने त्याचा गळा आवळून खून केला़ यानंतर भांडणातून पतीनेच आत्महत्त्या केल्याची माहिती पोलिसांना दिली़ मयत संजय शार्दुल याचा शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याची पत्नी मंगल शार्दुल हिस ताब्यात घेतले आहे़ या प्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जे़ ए़ नाईक करीत आहेत़--इन्फ ो--कौटुंबिक कलहातून हत्त्यादारूचे व्यसन असलेला संजय शार्दुल हा वारंवार पत्नी मंगल हिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, तसेच घरात सतत वाद घालायचा़ त्यातूनच त्याची पत्नीने हत्त्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली़फ ोटो :- ०५ पीएचएमए ९५संशयित मंगल शार्दुल