शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरा-नवरीचा हार्टअटॅकनं मृत्यू; असं का घडले? तज्ज्ञ सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 14:25 IST

नवरा-नवरीच्या खोलीतील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. वधू-वर मृत अवस्थेत खोलीत आढळले.

उत्तर प्रदेशातील बहराइच शहरात धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन कुटुंबातील लग्नाचा आनंद शोकसागरात विरून गेला. २२ वर्षांच्या मुलाची लग्नाची मिरवणूकीत नाचून कुटुंबातील सदस्याने २० वर्षांच्या मुलीला त्यांची सून म्हणून घरी आणले. घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधू-वर एकत्र खोलीत जातात, पण सकाळी दोघांची खोली उघडत नाही. कुंडी वाजवूनही दोघांची खोली उघडत नाही, तेव्हा वराच्या लहान भावाने खिडकीतून खोलीत उडी मारली.

नवरा-नवरीच्या खोलीतील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. वधू-वर मृत अवस्थेत खोलीत आढळले. जेव्हा त्याने पटकन कुंडी उघडली तेव्हा कुटुंबातील इतर लोक येऊन नवऱ्याला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे शरीर थंड होते. नवरीही मृत होती. घरात कल्लोळ माजला. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले तेथे पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि जे कारण समोर आले ते हैराण करणारे होते. 

या दोघांनाही एकाचवेळी हार्टअटॅक आला होता. एकाचवेळी हार्टअटॅक येऊ शकतो का? दोघांचा मृत्यू त्यामुळेच झाला का? इतक्या कमी वयात हे कसं होऊ शकते? दोघांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उभे राहिले. याबाबत हृदयरोग तज्ज्ञ आणि फोर्टिस हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.अजय कौल यांनी सांगितले की, कोरोना महामारीनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आकडेवारी पाहिली तर दररोज अशा बातम्या वाचायला मिळतात ज्यामध्ये लोकांना चालताना हृदयविकाराचा झटका येतो. सायलेंट हृदयविकाराचा झटका सर्व वयोगटातील लोकांना बळी बनवतोय. कोरोना हा RNA व्हायरस आहे. अशा विषाणूंमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात किंवा ब्लॉकेज होतात ज्यामुळे हृदयातील रक्त प्रवाह असामान्य होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. नवरा-नवरीचा एकाचवेळी मृत्यू ही घटना अत्यंत दुर्मिळ आहे. याला सेक्सुअल एक्टिविटीशी पूर्णत: जोडले जाऊ शकत नाही. 

सेक्सुअल एक्टिविटीदेखील कारण असू शकते?या प्रकरणात, कौटुंबिक इतिहास प्रथम पाहिला पाहिजे. असे होऊ शकते की दोघांना आधीच हृदयाचा त्रास आहे, ज्यांना हृदयाचा त्रास आहे अशा दोन व्यक्तींनी लग्न करणे ही काही मोठी गोष्ट नाही. तणाव, परिस्थिती आणि लैंगिक क्रियाकलाप दरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आला आहे. एकप्रकारे, दोन व्यक्तींना एकत्र हृदयविकाराचा झटका आला तर त्याला अंधश्रद्धेशी जोडले जावे, हे गौन आहे. महामारीनंतर वाढलेल्या हृदयाच्या समस्यांशी त्याचा संबंध जोडूनच मी हे पूर्णपणे पाहू शकतो.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका