शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हुरियत नेत्यांची केंद्र सरकारशी चर्चेची तयारी, काश्मीरमधील स्थिती सुधारल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 04:45 IST

काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियत नेत्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे

श्रीनगर : काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियत नेत्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शनिवारी दिली.दूरदर्शनने आयोजिलेल्या एका समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे दोन मंत्री व्यासपीठावर उपस्थित होते. सत्यपाल मलिक म्हणाले की, मी काश्मीरचा राज्यपाल म्हणून सूत्रे स्वीकारली त्यावेळी असलेल्या परिस्थितीत आता खूपच सुधारणा झाली आहे. हुरियत नेत्यांनी चर्चेस तयार व्हावे, असे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी याआधी आवाहन केले होते; पण त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. आता आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे हुरियत नेते किमान बोलून तरी दाखवत आहेत.चर्चेसाठी तयार असल्याचे वक्तव्य हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवाईज उमर फारुक यांनी एका मुलाखतीत केले होते. ते म्हणाले होते की, मोदी सरकारने काश्मीरमधील थांबलेली राजकीय प्रक्रिया पुन्हा प्रवाही केली पाहिजे. राज्यात सुरू असलेला हिंसाचार थांबविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. या दिशेने सरकारने योग्य पावले उचलल्यास त्याला आम्ही नक्की सहकार्य करू. अशाच प्रकारचे आवाहन मिरवाईज उमर फारुक यांनी श्रीनगरमधील जामा मशिदीमध्ये स्थानिक नागरिकांसमोर केलेल्या भाषणात म्हटले होते की, काश्मीरचा प्रश्न संघर्ष किंवा लष्करी बळाचा वापर करून नव्हे, तर चर्चेच्या माध्यमातूनच सोडविला जाऊ शकतो.दगडफेकीच्या प्रकारांत झाली घटकेंद्र सरकारशी चर्चेची तयारी दर्शविणारे मिरवाईज उमर फारुक यांना हे सध्या स्थानबद्धतेत आहेत. काश्मीर विद्यापीठातील पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहाण्यास मिरवाईज यांना शनिवारी मनाई करण्यात आली. काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांत सामील होणाऱ्या युवकांच्या संख्येत, तसेच शुक्रवारी नमाज पठणानंतर स्थानिक नागरिकांकडून सुरक्षा दलांवर केल्या जाणाºया दगडफेकीच्या प्रकारात घट झाली आहे. दहशतवादाकडे वळलेल्या युवकांना त्या मार्गापासून परावृत्त करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे राज्यपाल मलिक म्हणाले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliticsराजकारण