शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मानवी हक्क संघटनांना गुन्हेगारासारखी वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 03:58 IST

देशातील मानवी हक्क संघटनांना केंद्र सरकार गुन्हेगारांप्रमाणे वागवत आहे, असा आरोप अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे कार्यकारी संचालक आकार पटेल यांनी केला.

बंगळुरू : देशातील मानवी हक्क संघटनांना केंद्र सरकार गुन्हेगारांप्रमाणे वागवत आहे, असा आरोप अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे कार्यकारी संचालक आकार पटेल यांनी केला. परकीय चलनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने या संस्थेच्या दोन कार्यालयांवर गुरुवारी धाडी टाकल्या होत्या.त्यावर आकार पटेल म्हणाले की, सर्व कायद्यांचे अ‍ॅम्नेस्टी इंडिया काटेकोर पालन करते. पारदर्शकता व विश्वासार्हता हे आमच्या कार्याचे मुख्य सूत्र आहे. या संस्थेला विदेशी देणगी नियंत्रण कायद्यांतर्गत देण्यात आलेला परवाना गृहखात्याने २०१० साली रद्द केला होता.अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया फाऊंडेशन या दोन संस्थांचा परस्परसंबंध काय आहे, याविषयी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्याबद्दल पटेल म्हणाले की, संचालनालयाने मागितलेली सर्व कागदपत्रे समाजमाध्यमांवर आधीच उपलब्ध आहेत. तसेच ही कागदपत्रे याआधीही ईडीला दिली होती. अ‍ॅम्नेस्टी इंडियाच्या विद्यमान रचनेची माहिती संस्थेच्या वेबसाईटवर २०१४ पासून आहे.सहा वर्षांत अ‍ॅम्नेस्टी इंडियाच्या कार्याला ४० लाख भारतीयांनी पाठिंबा दिला, तसेच एक लाख नागरिकांनी संस्थेला देणग्या दिल्या. या संस्थेची बँक खाती ईडीने गोठवली आहेत. अशीच कारवाई ग्रीनपीस इंडिया या संस्थेविरोधात केंद्र सरकारने केली होती. (वृत्तसंस्था)>आणीबाणीची पुनरावृत्तीजगातले कोणतेही राष्ट्र असो, तिथे मानवी हक्क रक्षणासाठी लढा देणे, हे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्य काम आहे. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसारच आम्ही मानवाधिकारांसाठी काम करीत आहोत. आणीबाणीच्या काळात झालेली दडपशाही हा भारताला लागलेला कलंक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्याच दडपशाहीची आठवण व्हावी अशा घटना सध्या भारतात पुन्हा घडताना दिसत आहेत, अशी टीकाही पटेल यांनी केली.