शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हल्ला घडविणारेच हल्ल्याची निंदा कशी करतील ? राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 12:39 IST

हल्ल्याच्या मागे भाजपा असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे

ठळक मुद्देहल्ल्याच्या मागे भाजपा असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहेराहुल गांधी यांनी दगडफेकीच्या या घटनेवरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांनी हा हल्ला घडवून आणला, ते स्वतः याची निंदा कशी करतील

अहमदाबाद, दि. 5- गुजरातमधील बनासकांठामध्ये पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मागे भाजपा असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी दगडफेकीच्या या घटनेवरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर शनिवारी प्रतिक्रिया दिली. माझ्यावर हल्ला करणारे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते आणि त्यांची व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकारण करण्याची हीच पद्धत आहे,  त्यावर काय बोलू शकतो?असा थेट आरोप राहुल यांनी केला. या, संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिलेली नाही. हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर राहुल गांधी म्हणाले, ज्यांनी हा हल्ला घडवून आणला, ते स्वतः याची निंदा कशी करतील.

नेमकं प्रकरण काय ?गुजरात दौ-यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या गाडीवर धनेरा येथील लाल चौकात हा हल्ला करण्यात आला . काँग्रेसने या हल्ल्यामागे भाजपा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला आहे. भाजपाने मात्र हे आरोप फेटाळून लावत काँग्रेसला आमच्यावर आरोरप करायची सवय झाली आहे असं म्हटलं आहे. बनासकाठामध्ये राहुल गांधी म्हणाले, मी तुम्हा सर्वांमध्ये येऊ इच्छितो, काँग्रेस पक्ष हा तुमच्यासोबत आहे. मी पूरग्रस्तांच्या सोबत आहे. तत्पूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांशी बातचीत केली होती. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती उद्भवली आहे. मोठ्या संख्येनं लोक पुरात अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम काम करतेय. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा गुजरातच्या पूरग्रस्त स्थितीची पाहणी केली होती.