शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक वाहनांचे गडकरींचे स्वप्न साकार कसे होईल?, २0३0 पर्यंत प्रत्यक्षात येणे अवघडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:05 IST

भारतात वाहनांच्या इंधनासाठी सर्वाधिक आयात खर्च होतो. सन २0३0पर्यंत रिक्षा, कार्स, बसेस, दुचाकी अशी सर्व वाहने इंधनाऐवजी इलेक्ट्रिक ऊर्जेवर चालणारी असावीत, असा सरकारचा आग्रह आहे.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : भारतात वाहनांच्या इंधनासाठी सर्वाधिक आयात खर्च होतो. सन २0३0पर्यंत रिक्षा, कार्स, बसेस, दुचाकी अशी सर्व वाहने इंधनाऐवजी इलेक्ट्रिक ऊर्जेवर चालणारी असावीत, असा सरकारचा आग्रह आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक वाहने बनवण्यावर वाहन उत्पादन कंपन्यांनी लक्ष केंद्रित करावे, अन्यथा विपरीत परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल, अशी ताकीद परिवहनमंत्री नितीन गडकरींनी दिली आहे. पण २0३0पर्यंत हा प्रयोग साकार होण्याची चिन्हे धूसर आहेत.इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या हालचाली सरकारी स्तरावर दिसत नाहीत. आवश्यक धोरणही सरकारने ठरवलेले नाही. वाहन कंपन्यांचे मालक व संचालकही सूचक मौन पाळून आहेत. या वर्षअखेरीला इलेक्ट्रिक वाहनविषयक धोरण जाहीर होईल. मिळालेल्या माहितीनुसार, निती आयोग कालबद्ध योजना तयार करणार आहे. त्यावरील निर्णय परिवहन मंत्रालय घेईल. या प्रक्रियेत अवजड उद्योग, पेट्रोलियम व ऊर्जा मंत्रालयाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तथापि सरकारने त्या दिशेने चर्चा सुरू केलेली नाही. संसदेलाही त्याबाबत विश्वासात घेतलेले नाही.जगभर इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाºया अन्य कंपन्याही भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत का? इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी देशातील निर्मात्यांची कितपत तयारी आहे? वाहननिर्मितीसाठीचे आवश्यक तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे काय? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत.सुरुवातीला इलेक्ट्रिक वाहने बनवण्याचा उत्पादन खर्च इंधनाधारित वाहनांपेक्षा ५0 टक्के अधिक असेल. या वाहनांसाठी वापरल्या जाणाºया बॅटºया विशिष्ट कालावधीनंतर खराब झाल्या की बदलाव्या लागतील. मग खराब बॅटºयांची वासलात कशी लावणार? असे प्रश्नही आहेत.> टेसला कंपनीचा भारतात येण्यास नकारअत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणारी जगातली सर्वांत मोठी व प्रसिद्ध कंपनी टेसलाचे उत्पादन सॅन फ्रॅन्सिस्कोला होते. परदेश दौºयात नितीन गडकरींनी या कंपनीला भेट दिली व उत्पादन प्रक्रियेची पाहणी केली. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन टेसलाने करावे, असा आग्रह गडकरींनी धरला. न्हावाशेवा बंदरालगत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टजवळच्या एसईझेडमधे टेसलासाठी जागा देण्याची तयारीही दर्शवली. तथापि टेसला कंपनीकडे खूप काम असल्याने भारतात येण्यास कंपनीच्या संचालकांनी नकार दिला. त्यांचे प्राधान्य चीनला अधिक आहे, असे समजते.>सुविधांची गरजइलेक्ट्रिक वाहनांसाठी पायाभूत सुविधा उभ्या करणे हे काम सोपे नाही. लाखो वाहने चार्ज करण्यासाठी पुरेशी वीज देशात उपलब्ध होईल काय? त्याची किंमत किती मोजावी लागेल? केवळ चार्जिंग पॉइंट पुरेसे नसून, या वाहनांच्या दुरुस्तीसाठी अत्याधुनिक वर्कशॉप्स व गॅरेजेस व प्रशिक्षण केंद्रेही लागणार आहेत. त्याची तयारी दिसत नाही.