नवी दिल्ली - नेव्हिगेशनसाठी गूगल मॅप्स विश्वासार्ह मानले जाते. मात्र, देशात वारंवार अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने त्याच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'मॅपिंग एरर 'संदर्भात सध्या कोणताही स्पष्ट कायदा नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. अलीकडेच चित्तौडगड येथे चुकीच्या रस्त्याने गेलेली व्हॅन नदीत पडून तीन महिलांचा मृत्यू झाला. तसेच नवी मुंबई, उत्तर प्रदेशासह देशातील अनेक भागांत गूगल मॅप्सच्या दिशाभूल करणाऱ्या मार्गदर्शनामुळे जीवघेण्या घटना घडल्या आहेत.
स्वतंत्र धोरण करणारअपघातांच्या पार्श्वभूमीवर नीती आयोग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय मॅपिंग त्रुटींवर नियंत्रणासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचा विचार करत आहेत. येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित नेव्हिगेशन प्रणालींमध्ये 'हाय रिस्क रूट वॉर्निंग' आणि 'रिअल-टाइम फीडबॅक' सारख्या सुविधा बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे : तज्ज्ञांच्या मते, देशात पत्ते व रस्त्यांचे एकसमान मानक नाही. गूगल मॅप्ससह इतर सेवांमध्येही जुना डेटा, बंद पडलेले पुलांची माहिती अद्ययावत होत नाही.
स्वदेशी पर्यायही आहेत उपलब्धभारत मॅप (एनआयसी प्लॅटफॉर्म) : भारतीय परिस्थितीनुसार तयार केलेला डेटा.इसो भुवन पोर्टल: आपत्ती व्यवस्थापन व शहरी नियोजनासाठी उपयुक्त उपग्रहाधारित सेवा.
स्वदेशी पर्यायही आहेत उपलब्धभारत मॅप (एनआयसी प्लॅटफॉर्म) : भारतीय परिस्थितीनुसार तयार केलेला डेटा.इसो भुवन पोर्टल: आपत्ती व्यवस्थापन व शहरी नियोजनासाठी उपयुक्त उपग्रहाधारित सेवा.