शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी दिल्लीत राहतात किती माकडे? लवकरच होणार मोजणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 16:25 IST

सध्या दिल्लीकर माकडांच्या उच्छादामुळे त्रस्त झालेले आहेत.

नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमधील प्रत्येक घटनेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. दरम्यान, सध्या दिल्लीकर माकडांच्या उच्छादामुळे त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे दिल्लीतील माकडांची समस्या किती भयानक आहे हे जाणून घेण्यासाठी दिल्लीत असलेल्या माकडांची लवकरच मोजणी करण्यात येणार आहे. ही मोजणी देहराडूनस्थित  वाइल्डलाइफ इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या मदतीने होणार आहे. दिल्लीतील माकडांना पकडण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र ही समस्या जैसे थे आहे.  दिल्लीतील माकडांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची यावरून दिल्ली  महावनगरपालिका आणि वनविभागामध्ये वाद सुरू होता. अखेरीस 2007 मध्ये दिल्ली सरकारने माकडांना पकडण्यासाठी पिंजरे उपलब्ध करून द्यावेत. तसेच महानगरपालिकेने हे पिंजरे विविध ठिकाणी ठेवावेत, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांची बैठक झाली. या बैठकीत माकडांची गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, दिल्लीत नेमकी किती माकडे राहतात याचा आकडा समजू शकलेला नाही. यापूर्वी दिल्ली महानगरपालिकेने नागरी वस्त्यांमधील माकडांना पकडून असोला वन्यजीव उद्यानात सोडले आहे. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही झाला आहे. मात्र असे असतानाही राजधानीमध्ये गतवर्षी सुमारे 950 जणांना माकडांनी चावा घेतल्याचे समोर आले होते. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता.  निवासी भागांमधील माकडांची घुसखोरी रोखण्यासाठी माकडांना सोडण्यात आलेल्या भागांच्या बाहेर 15 फूट उंच भिंत उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले होता. दरम्यान, सुमारे 20 हजारहून अधिक माकडांना अभयारण्यात सोडण्यात आले. मात्र रहिवासी भागात अद्याप किती माकडे आहेत, याचा नेमका आकडा आपल्याकडे नाही. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

टॅग्स :MonkeyमाकडNew Delhiनवी दिल्ली