शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लसीचे किती डोस?, कोण करणार खर्च? अशा प्रश्नांवर एम्सच्या गुलेरिया यांनी दिलं उत्तर; म्हणाले...

By जयदीप दाभोळकर | Updated: January 2, 2021 11:27 IST

कोणाला दिलं जाणार प्राधान्य, दोन डोसमध्ये किती दिवसांचं असेल अंतर यावर गुलेरिया यांनी केलं भाष्य

ठळक मुद्देकोणाला प्राधान्यक्रमानं लस दिली जाईल याची यादी तयार करण्याचं काम सुरू असल्याची गुलेरिया यांची माहिती प्रत्येकाला दिले जाणार लसीचे दोन डोस

कोरोनाच्या लसीचे किती डोस दिले जाणार?, यासाठी कोण खर्च करणार? अशा अनेक प्रश्नांचं ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसेजचे (एम्स) संचालक रणदीप गुलेरिया यांनी उत्तर दिलं. सद्यस्थितीत लसीचा खर्च हा केंद्र सरकार करणार असल्याचे ते म्हणाले. सध्या ज्या लोकांना गंभीर आजार आहेत अशा लोकांची यादी तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्स यांच्यानंतर त्यांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याची माहिती रणदीप गुलेरिया यांनी दिली. "मी एका समितीचा अध्यक्ष आहे. आम्ही अनेक मापदंड तयार केले आहेत. श्वसनाचे विकार असलेले, मधुमेह आणि किडनीचे विकार असलेल्या लोकांबाबक एक स्कोरिंग सिस्टम तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या आधारावर गंभीर आजार असेलेल्या लोकांना प्राधान्यानं लस दिली जाऊ शकते," असं गुलेरिया म्हणाले. एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "उदाहरण द्यायचं झाल्यास एका व्यक्तीचा मधुमेहाचा त्रास नियंत्रणात आहे. तर दुसरी व्यक्ती गेल्या दहा वर्षांपासून इन्सुलिन घेत आहे. अशात मधुमेहाचा जास्त त्रास असलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जाईल," असंही ते म्हणाले.यावेळी गुलेरिया यांनी लसीची किंमत आणि त्याचा खर्च कोण करणार यावरही उत्तर दिलं. सद्यस्थितीत लसीचा खर्च हा सरकार करणार आहे. अन्य लसीकरणाच्या कार्यक्रमांप्रमाणेच हा कार्यक्रम असेल. प्रत्येक व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या दोन डोसमध्ये २८ दिवसांचं अंतर ठेवणं आवश्यक नाही. ब्रिटनमध्येही पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये २८ दिवस ते १२ आठवड्यांचं अंतर ठेवण्यात आल्याची माहिती डॉ. गुलेरिया यांनी दिली. "यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना इम्युनिटी दिली जाऊ शकते आणि दुसरा डोस लगेच देण्यावरही आरोग्य यंत्रणांवर ताण येणार नाही. ब्राझीलमध्येही लसीच्या अशाच टाईमलाइननं याचा इम्युनिटीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं सिद्ध झालं आहे," असंही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAIIMS hospitalएम्स रुग्णालय