शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

'एकाचवेळी गांधी-गोडसे सोबत कसकाय चालू शकतात '

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 12:55 IST

जदयू पक्ष भाजपसोबत जाऊन देखील बिहारच्या विकासासाठी उपयोग होत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी नमूद केले.

नवी दिल्ली - निवडणूक रणनितीकार आणि जनता दल युनायटेडचे माजी उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी आगामी काळासाठीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच बिहारमध्ये अस्तित्वात असलेल्या भाजप आणि जनता दल युनायटेडच्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जोरदार टीका केली आहे. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांची विचारधारा एकत्र कसकाय चालू शकते, असा सवाल किशोर यांनी उपस्थित केला आहे. 

प्रशांत किशोर म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्यासाठी पितातुल्य आहेत. त्यांनी मला मुलासारखी वागणूक दिली. त्यांचा प्रत्येक निर्णय मला मान्य आहे. त्यांनी मला पक्षातून काढले त्यावर आपण नाराज नाही. यावेळी त्यांनी आपला आगामी कार्यक्रम घोषीत केला. येणाऱ्या 20 फेब्रुवारीपासून 'बात बिहार की' हे अभियान ते सुरू करणार आहेत.

या अभियानासाठी बिहारमधील 8 हजारहून अधिक गावांमधील नागरिकांना निवडण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात बिहार आघाडीच्या 10 राज्यांमध्ये असावे, असा विचार करणाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र एखाद्या राष्ट्रीय पक्षासोबत जाणार का, यावर त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.

दरम्यान भाजप-जदयू युतीवर त्यांनी हल्लाबोल केला. महत्मा गांधी आणि गोडसे यांची विचारधार भिन्न आहे. त्यामुळे हे दोघे एकत्र चालू शकत नाही, असा टोला त्यांनी जदयू-भाजप युतीला लगावला आहे. तसेच जदयू पक्ष भाजपसोबत जाऊन देखील बिहारच्या विकासासाठी उपयोग होत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी नमूद केले.