शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आता कसं वाटतंय? तुरुंगात असलेल्या चिदंबरमना अमर सिंहांचा चिमटा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 13:23 IST

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

ठळक मुद्देआयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सध्या न्यायालयीन कोठडीतखासदार अमर सिंह यांनी न्यायालयीन कोठडीत बंद असलेल्या चिदंबरम यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त करण्याच्या बहाण्याने त्यांना काढला चिमटा इतिहास स्वत:ची पुनरावृत्ती करतो, असा लगावला टोला

लखनौ -  आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, खासदार अमर सिंह यांनी न्यायालयीन कोठडीत बंद असलेल्या चिदंबरम यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त करण्याच्या बहाण्याने त्यांना चिमटा काढला आहे. इतिहास स्वत:ची पुनरावृत्ती करतो, असा टोला अमर सिंह यांनी गुरुवारी ट्विटरवरून लगावला.  गुरुवारी संध्या काळी केलेल्या ट्विटमध्ये अमर सिंह म्हणतात,''माझे जुने परिचित असलेल्या पी. चिदंबरम यांच्याबाबत पहिल्यांदाच सहानूभुती वाटत आहे. माझ्यावर मुत्रपिंड प्रत्यार्पणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही काळातच त्यांचे सरकार वाचवले असतानाही त्यांनी माझी तुरुंगात रवानगी केली होती. मी त्याच तुरुंगातील फरशीवर उशीशिवाय झोपलो होतो. आज इतिहास पुन्हा एकदा स्वत:ची पुनरावृत्ती करत आहे. पी. चिदंबरम, आता तुम्हाला कसं वाटतंय?"'  अमर सिंह यांनी चिदंबरम यांच्यावर आरोप करणारे आपले व्हिडीओ यापूर्वीही प्रसिद्ध केले होते. पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री असताना अनेक कंपन्यांना मनमानी पद्धतीने पैशांचे वाटप केले होते, असा आरोपही अमर सिंह यांनी रुग्णालयातील बेडवरून प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमधून केला होता.  दरम्यान, आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून ओळखले जाणारे आणि सामान्य जनतेच्या स्वप्नातील अर्थसंकल्प सादर करण्यासाठी लोकप्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कधी कल्पना सुद्धा केली नसेल की त्यांना तिहार तुरुंगात राहावे लागेल. मात्र, ते न्यायालयीन कोठडीचे दिवस तिहार तुरुंगात मोजत आहेत.  आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी पी. चिदंबरम यांची सीबीआय न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर आज विशेष न्यायालयाने पुन्हा चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पी. चिदंबरम यांना तिहार तुरुंगात वेस्टर्न टॉयलेट, टीव्ही, पुस्तकं, चष्मा आणि औषधेही देण्यात आली आहेत. पी. चिदंबरम यांना या सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांना कोर्टात एक अर्ज दाखल केला होता. त्याला न्यायालयाने  मंजुरी देत पी. चिदंबरम यांना तुरुंगात सुरक्षा पुवण्याचे आदेश दिले होते. पी. चिदंबरम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हापासून ते सीबीआयच्या ताब्यात होते. आज त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती असून त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमPoliticsराजकारण