शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला? 14 दिवसांमध्ये होणार खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 21:40 IST

हेलिकॉप्टर अपघाताचे कारण शोधण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक समिती नेमली आहे. या समितीचा तपास वेगाने सुरू असून, पुढील दोन आठवड्यांत समिती आपली रिपोर्ट सादर करू शकते.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत(CDS General Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नीसह लष्कराच्या 11 अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी सरकारने एक समिती नेमली होती. आता सरकारी सूत्रांकडून मिळालेल्य माहितीनुसार, या समितीचा तपास वेगाने सुरू असून, पुढील दोन आठवड्यांत समिती आपली रिपोर्ट सादर करू शकते. 

संरक्षण मंत्रालयाने नेमलेल्या या समितेचे नेतृत्व वायुसेनेचे अधिकारी आणि देशातील सर्वश्रेष्ठ हेलिकॉप्टर पायलटांपैकी एक असलेले एअर मार्शल मानवेंद्र सिंग आणि नौदलाचे ब्रिगेडियर दर्जाचे अधिकारी करत आहेत. सरकारी सूत्रांनी वृत्त संस्थेला सांगितल्यानुसार, तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील अपघात स्थळाजवळ उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी तपास पथकांनी आपले काम सुरू केले होते. त्यामुळे आता पुढील दोन आठवड्यांत या पथकाने आपली कार्यवाही पूर्ण करणे अपेक्षित आहे. 

तपासावर संरक्षण मंत्र्यांचे लक्षसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह वैयक्तिकरित्या या तपास प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून ते नियमितपणे अपडेट घेत आहेत. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी हे देखील कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. लष्कराचे मुख्यालय तपासाच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, नवीन सीडीएस नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच नाव जाहीर केले जाईल.

8 डिसेंबर रोजी हा अपघात झाला

8 डिसेंबर रोजी जनरल बिपिन रावत, एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 12 लष्करी अधिकारी वेलिंग्टनमधील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात उतरण्याच्या काही मिनिटांपूर्वी अपघात झाला. यात सर्वांचा त्याच दिवशी मृत्यू झाला, तर एका अधिकाऱ्याची 15 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना