शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! मृत व्यक्तीवर उपचार करत होतं रुग्णालय; तब्बल 14 लाखांचं बिल, कुटुंबाचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 08:31 IST

रुग्णालयात दाखल असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरही रुग्णालयाने मृतदेहावर उपचार करुन लाखो रुपयांचं बिल दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

हरियाणाच्या सोनीपतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरही रुग्णालयाने मृतदेहावर उपचार करुन लाखो रुपयांचं बिल दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि नातेवाईकांवर अनेक आरोप केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाचा मृत्यू झाला होता पण डॉक्टरांनी जाणूनबुजून त्याच्यावर उपचार केले आणि लाखो रुपयांचं बिल केलं. तसेच ड़ॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप देखील करण्यात आला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर रुग्णालयात येऊन खूप गोंधळ घातला. सोनीपतच्या राई गावात राहणाऱ्या धर्मवीर यांना कुटुंबाने हाय बीपीचा त्रास असल्याने 10 दिवसांआधी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. 

डॉक्टरांनी नातेवाईकांना तेव्हा धर्मवीर यांच्या उपचारासाठी चार लाख जमा करा असं सांगितलं. तसेच ऑपरेशन झाल्यावर ते बरे होतील असंही म्हटलं. मात्र उपचारादरम्यान कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना धर्मवीर यांना भेटून दिलं नाही. कुटुंबीयांना शंका आली तेव्हा त्यांनी आम्ही रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवतो असं सांगितलं. त्याच वेळी नेमकं डॉक्टरांनी तुमच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे असं सांगितलं. 

धर्मवीर यांचा मृत्यू झाल्यानंतर गावकरी आणि नातेवाईक रुग्णालयाजवळ मोठ्या संख्येने जमले. त्यांनी गोंधळ घातला. या घटनेची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली. रुग्णाचा आधीच मृत्यू झाला होता. पण यांनी सांगितलं नाही. दहा दिवसांचं 14 लाख बिल दिलं आहे. एक गरीब कुटुंब एवढे पैसे कुठून आणणार असा सवाल देखील कुटुंबाने विचारला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर