शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

हनीप्रीत नेपाळच्या मोरांग शहरात?, ४३ जण मोस्ट वाँटेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 4:10 AM

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला शिक्षा सुनाविल्यानंतर पंचकुला, सिरसा व हरयाणाच्या अन्य भागांत झालेल्या हिंसाचारप्रकरणी हरयाणा पोलिसांनी ४३ जणांची मोस्ट वाँटेड लिस्ट काढली असून, त्यात हनीप्रीतचे नाव सर्वात वर आहे. ती नेपाळमध्ये पळून गेल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे.या यादीत डेराचा प्रवक्ता आदित्य इन्सा हाही असून, ते दोघे ...

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला शिक्षा सुनाविल्यानंतर पंचकुला, सिरसा व हरयाणाच्या अन्य भागांत झालेल्या हिंसाचारप्रकरणी हरयाणा पोलिसांनी ४३ जणांची मोस्ट वाँटेड लिस्ट काढली असून, त्यात हनीप्रीतचे नाव सर्वात वर आहे. ती नेपाळमध्ये पळून गेल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे.या यादीत डेराचा प्रवक्ता आदित्य इन्सा हाही असून, ते दोघे फरार आहेत. शिक्षेनंतर राम रहीमला न्यायालयातून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप हनीप्रीतवर आहे. डेराचा कार्यकर्ता प्रदीप गोयल इन्सा आणि प्रवक्ता आदित्य इन्साचा नातेवाईक प्रकाश यांना आधीच अटक झाली आहे.हनीप्रीत बिहारमार्गे नेपाळमध्ये पळून गेल्याची पोलिसांची खात्री पटली असून, तेथील मोरांग शहरात ती आहे, असे सांगण्यात येते. तिथे तिला काहींनी पाहिले असल्याचे सांगण्यात आले. हनीप्रीतविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)हल्लेखोरांची छायाचित्रे उपलब्धपंचकुलामध्ये हिंसा पसरविण्याचा आरोप असलेल्यांची ही जी यादी आहे, त्यात माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवले ठेवले जाईल. त्यांची माहिती घेण्यासाठी विशिष्ट फोन नंबर, व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि ईमेल आयडी प्रसिद्ध केले जाणार आहेत.सिरसामध्ये हिंसा पसरविणाºयांची माहिती फोटोग्राफ आणि व्हिडीओद्वारे घेण्यात आली आहे. छायाचित्रे व व्हिडीओमध्ये हल्लेखोर शस्त्र घेऊन दिसत आहेत. काहींचे चेहरे झाकलेले आहे.